मुंबईतील नागरी समस्येवर व्यक्त होणारी पत्रचळवळ अखेर थांबली...

anthony parakal.
anthony parakal.

मुंबई : नागरी प्रश्नांकडे प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पूर्वी नागरिकांकडे हक्काचे माध्यम होते, ते म्हणजे वर्तमानपत्रातील वाचकपत्रे. त्यामाध्यमातून अनेकजण सरकाच्या निर्णयावर टीका करायचे, कौतुक करायचे, आपल्या मागण्या-समस्या मांडायचे. अशाच प्रकारे तब्बल पाच दशके प्रशासनाचे लक्ष वेधणाऱ्या अँथनी पाराकाल (वय 89) यांचे नुकतेच निधन झाले. आपल्या मालाडमधील छोट्याशा घरातील टाइपरायटरवरुन त्यांनी वाचकपत्राच्या माध्यमातून नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. त्यांची तब्बल पाच हजार वाचक पत्रे मुंबईतील विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती.

पाराकाल यांच्या निधनाची जाहिरात वाचून मुंबईतील अनेक पत्रकारांना त्यांची आठवण झाली. त्यांनी 1953 ते 2005 या कालावधीत सातत्याने वाचक पत्रे लिहिली. त्यांचे नाव 1993 च्या लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वाधिक वाचकपत्रे प्रसिद्ध झाल्याबद्दल समावेश करण्यात आले होते. प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी हे पत्रलेखन बंद केले. मात्र त्यापूर्वी त्यांची पाच हजार पत्रे प्रसिद्ध झाली होती. त्यांच्याकडे प्रसिद्ध वाचक पत्रांच्या 16 फाईल्स आहेत.
 
'वारांच्या गुगलीने' मांसाहारी खवय्यांचा हिरमोड; रविवारी गुरुपौर्णिमा तर बुधवारी संकष्टी...

पाराकाल यांच्या पत्रांचा प्रशासनावर प्रभाव पडत होता. त्यांनी पश्चिम रेल्वे स्थानकांवरील फलाट आणि उपनगरी रेल्वे यातील वाढत्या अंतराकडे लक्ष वेधले. फलाटांची उंची वाढवण्याचा निर्णय घेताना पश्चिम रेल्वेने त्यांच्या पत्राचा आवर्जून उल्लेख केला होता. रेल्वेत नोकरीस असलेल्या पाराकाल यांची 1953 मध्ये झाशीहून मुंबईत बदल झाली. तेंव्हापासून त्यांनी वाचकपत्राच्या माध्यमातून शहरातील अस्वच्छता, असुविधा, पाणी प्रश्न याकडे सतत लक्ष वेधले. त्यांना पत्रकार होण्याची इच्छा होती. त्यामुळे ते शॉर्टहँड शिकले होते. 

ते रोजच्या मालाड-चर्चगेट प्रवासात शहरातील सूचलेल्या विषयावर शॉर्टहँडमध्ये नोट काढत असत  त्यानंतर घरी आल्यावर ती टाईप करीत आणि दुसऱ्या दिवशी लंच टाईमच्यावेळी पोस्ट करीत असत. वाचकपत्रे पाठवण्याच्या छंदापायी खर्चही होत असे, त्यामुळे खर्चाची जुळवाजुळव अवघड होत असे. पण त्यांनी मोहीम थांबली नाही. त्यांनी अनेक ठिकाणी बस स्टॉप सुरु करण्यासाठी मोहीम सुरु केली त्यातील काहींना यशही आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com