चढ-उतारावर वाहन राहणार सुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti Down Mechanism for Motor Vehicle detection

चढ-उतारावर वाहन राहणार सुरक्षित

मुंबई : घाट चढ-उतारावर वाहनांचे अपघात होतात. चालकांना घाटामध्ये प्रसंगावधान राखून वाहन चालवावे लागते. यातून क्लच किंवा ब्रेकवरून पाय काढला तर वाहन मागे येऊन अपघात होतो. यावर उपाय काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अनुभाग अभियंता वैष्णवीप्रसाद रानडे यांनी अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकलचा शोध २०१३ मध्ये लावला आहे. त्यांच्या या शोधाला यंदा जागतिक स्वामित्व हक्क (पेटंट) मिळाला आहेत.

वैष्णवीप्रसाद कृष्णा रानडे हे पंढरपूरमधील शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या मध्य रेल्वेमध्ये वरिष्ठ अभियंता आणि सुरक्षा सल्लागार आहेत. नोकरी मिळण्यापूर्वी ते अगोदर ते शेतीकाम करायचे. त्यावेळी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर चढ-उतारावर चालवत असताना बऱ्याच समस्या येत होत्या. ट्रॅक्टर चढावावर बंद पडून मागे घसरण्याचा अनुभव आल्याने त्यांनी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयोग करीत अखेर २०१३ मध्ये ‘अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकल’चा शोध त्यांनी लावला. या शोधामुळे चढ-उतारावर वाहनांना हॅण्डब्रेक, उटी लावावी लागणार नाही. वाहन घसरणार नाही वा बंदही पडणार नाही, असा दावा करण्यात येत आहे.

संरक्षण दलातील वाहने होणार सक्षम

सैनिकांचा प्रवास, सीमेवर गस्त घालणे, युद्धजन्य परिस्थितीत मदत पोहोचवणे अशा अनेक कामांसाठी संरक्षण दल वाहनांचा वापर करते. त्यात ‘अँटी डाऊन मेकँनिझम’च्या वापर केला तर आपल्या जवानांना सुरक्षा मिळेल, असा दावा वैष्णवीप्रसाद रानडे यांनी केला.

केवळ सहा भाग

पाश्चिमात्य देशांतील संशोधकांनी ‘अँटी डाऊन मेकँनिझम फॉर मोटार व्हेईकल’साठी १०० सुटे भाग वापरले होते; तर वैष्णवीप्रसाद रानडे यांनी केवळ सहा सुट्या भागात हे तंत्र विकसित केले.

Web Title: Anti Down Mechanism For Motor Vehicle Detection Engineer Vaishnavi Prasad Ranade

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..