palghar collector office meeting
sakal
पालघर - विकासाच्या नावाखाली पालघर जिल्ह्यावर लादल्या जात असल्याचा आरोप होणाऱ्या विविध मोठ्या प्रकल्पांविरोधात आता संघटित लढ्याची तयारी सुरू झाली आहे. वाढवण बंदर, चौथी मुंबई, केमिकल झोन, रिफायनरी, महामार्ग आणि अन्य औद्योगिक प्रकल्पांच्या विरोधात स्थापन झालेल्या ‘पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समिती’ने ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभेचे आयोजन केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीवर समितीशी संबंधित संघटनांनी बहिष्कार घातल्याने प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत.