अँटिलिया स्फोटक प्रकरण : गोरच्या जामिनाविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

antilia explosive case
antilia explosive casesakal media

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Antlia bomb case) जामीन मिळालेला आरोपी क्रिकेट बुकी नरेश गोरच्या (accused bookie naresh gaur) सुटकेचा मार्ग अखेर एका महिन्यानंतर मोकळा झाला आहे. गोरच्या जामीनाविरोधात एनआयएने (NIA Petition) केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) आज नामंजूर केली. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात (Mansukh hiren murder) गोर आरोपी आहे. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin waze) यामध्ये प्रमुख आरोपी आहे. वाझेला सुमारे चौदा सीमकार्ड गोरने पुरविल्याचा आरोप असून या कटकारस्थानात गोरचाही सहभाग आहे, असा गंभीर आरोप तपास यंत्रणेने ठेवला आहे.

antilia explosive case
...अन् कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा गजाआड

गोरने विशेष न्यायालयात वकील अनिकेत निकम यांच्यामार्फत महिन्याभरापूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. हा जामीन गुणवत्तेच्या निकषांवर न्यायालयाने मंजूर केला. मात्र एनआयएने केलेल्या विनंतीनंतर विशेष न्यायालयाने स्वत:चाच आदेश अंतरिम स्थगित केला. याविरोधात गोरने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने गोरची याचिका मंजूर केली आणि विशेष न्यायालयाचा स्थगिती आदेश रद्द केला. यानंतर एनआयएने उच्च न्यायालयात जामिनाविरोधात अपील केले.

न्या नितीन जामदार आणि न्या सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ही अपील याचिका आज नामंजूर केली. केवळ सीम कार्ड पुरविली या आरोपासाठी दहशतवादी कारवाया किंवा कटकारस्थानात सहभाग असा आरोप करणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. सिम कार्ड पुरविण्यात आली तरी त्यातून कटकारस्थानासाठी आवश्यक असलेला सामायिक उद्देश आणि बैठक यामध्ये स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद वकील शिरीष गुप्ते आणि वकील अनिकेत निकम यांनी केला. या प्रकरणातील हा पहिला जामीन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com