अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात अर्णब गोस्वामी कोर्टात, दाखल केला नवा अर्ज

सुनीता महामुणकर
Saturday, 5 December 2020

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी गोस्वामी यांच्या सह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई, ता. 5 : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राविरोधात आता रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल केला आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग न्यायालयाने घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाची बातमी : अडचणी वाढणार ? शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तिसरा समन्स

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी गोस्वामी यांच्या सह कंत्राटदार फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याआधी गोस्वामी यांनी या प्रकरणाच्या तपासाला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी दोन स्वतंत्र अर्जाद्वारे केली आहे. मात्र पोलिसांनी काल दाखल केलेल्या अर्जामुळे आज त्यांनी पुन्हा नवीन अर्ज केला. अलिबाग न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊ नये, आणि संपूर्ण तपासाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय हा तपास सुरू झाला आहे, असा दावा गोस्वामी यांनी केला आहे.

मुंबईतील  सर्व महत्त्वाच्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा । Marathi News From Mumbai

पोलिसांनी दाखल केलेला 1914 पानी आरोपपत्रात  एकूण 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपपत्र आता अलिबाग सत्र न्यायालयाकडे सोपवले जाईल. त्यानंतर खटल्याची कारवाई सुरू होऊ शकेल. मात्र गोस्वामी यांच्या अर्जावर उच्च न्यायालयात पुढील आठवड्यात तातडीने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

( संपादन - सुमित बागुल )

anvay naik arnab goswami case bombay high court new petition


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anvay naik arnab goswami case bombay high court new petition