अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणः अर्णब गोस्वामींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

सुनीता महामुणकर
Wednesday, 6 January 2021

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणः याचिकेत सुधारणा करण्यासाठी अधिक अवधी मुंबई उच्च न्यायालयाने आज रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिली.

मुंबई: अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्यासाठी अधिक अवधी मुंबई उच्च न्यायालयाने आज रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिली.

गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्या विरोधात रायगड पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राची दखल अलिबाग सत्र न्यायालयाने घेतली आहे. तसेच उद्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र मोठे आणि मराठीमध्ये आहे त्यामुळे त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करावा लागणार आहे, असे गोस्वामी यांचे वकिल निरंजन मुंदरगी यांनी न्यायालयात सांगितले.

न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने याला अनुमती दिली. याचिकेवर पुढील सुनावणी 11 फेब्रुवारीला आहे. यापूर्वीही न्यायालयाने एक महिन्याचा अवधी मंजूर केला होता.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोपी सारडा यांच्यावतीने एड विजय आगरवाल यांनी बाजू मांडली. उद्या सत्र न्यायालयाने हजर राहण्याचे समन्स बजावले.आहे, असे त्यांनी खंडपीठाला सांगितले. यावर मग हजर रहा, खटला काही उद्यापासून सुरू होणार नाही, असे खंडपीठ म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी वास्तुविशारद नाईक यांनी आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आरोपींचा उल्लेख केला आहे. रायगड पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

हेही वाचा- डोंबिवलीतील नवा फूटओव्हर ब्रिज काढतोय नागरिकांचा जीव, सोयीपेक्षा गैरसोय जास्त?

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Anvay Naik suicide case Arnab Goswami granted relief by bombay High Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anvay Naik suicide case Arnab Goswami granted relief by bombay High Court