एपीएमसी प्रसासनाने प्रस्ताव सादर करावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. यासाठी एपीएमसी प्रसासनाने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एपीएमसी प्रशासनाला केल्या.

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. यासाठी एपीएमसी प्रसासनाने प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एपीएमसी प्रशासनाला केल्या. ते एपीएमसी बाजार समितीतील छत्रपती संभाजी भाजीपाला बाजार संकुलामध्ये गाळ्यांच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. 

यावेळी पाटील म्हणाले की, देशातील शेतीमालाच्या उत्पन्नात विक्रमी वाढ झाली आहे. साखरेचे उत्पन्न तीन वर्षे पुरेल एवढे झाले आहे. त्यामुळे या उत्पन्नाला भाव मिळण्यासाठी हा माल परदेशात जाणे गरजेचे आहे. भाजीपालादेखील कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून परदेशात पाठवणे गरजेचे आहे. यासाठी वाशीतील एपीएमसी बाजार हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणे आवश्‍यक आहे. यासाठी एपीएमसी प्रशासनाने प्रस्ताव तयार करून सरकारला सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एपीएमसी प्रशासनाला केले. 

आघाडी सरकारच्या काळात तीन वेळा थेट पणन कायदा आणण्यात आला. त्याची अंमलबजावणी झाली नाही. मात्र, मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर हा कायदा अंमलात आणला व त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला. याउलट व्यापाऱ्यांचेदेखील कोणतेही नुकसान झाले नसल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

अखेर पाठपुराव्याला यश
बाजाराच्या आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये येणारा अतिरिक्त कृषीपूरक व्यवसाय करण्यासाठी या २८५ गाळ्यांचा वापर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक व्यापाऱ्यांनी केली होती. १० वर्षांपूर्वीपासून ही मागणी प्रलंबित असलेल्या मागणीसाठी आमदार मंदा म्हात्रे यांनीही पाठपुरावा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The APMC administration should submit the proposal