युद्ध कोरोनाशी : अपुऱ्या मनुष्यबळाअभावी कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती

doctors
doctors
Updated on

मुंबई : मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था फक्त कोरोनाशीच नव्हे, तर अपुऱ्या वैद्यकीय मनुष्यबळाच्या समस्येशीही लढत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता सेव्हन हिल्स कोरोना रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने डॉक्‍टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील 30 पदव्युत्तर डॉक्‍टरांना मासिक साडेतीन लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, हे मानधन महापालिका आयुक्तांच्या वेतनापेक्षाही जास्त आहे.

महापालिकेने केलेल्या अभ्यासानुसार मुंबईतील एक लाख नागरिकांमागे अवघे 54 डॉक्‍टर असून, हे प्रमाण आवश्‍यकतेहून तब्बल 44 टक्के कमी आहे. महापालिकेने हा अहवाल पाच वर्षांपूर्वी तयार केला होता; मात्र या स्थितीत आजही फारसा फरक पडलेला नाही. 

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात तज्ज्ञ आणि पदवीधर डॉक्‍टरांची गरज भासू लागली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी 15 मेडिसीन पदवीधर, 10 भूलतज्ज्ञ, तीन मूत्रपिंड विकारतज्ज्ञ, एक हृदयरोगतज्ज्ञ व एक न्यूरोलॉजिस्ट अशा 30 तज्ज्ञ डॉक्‍टरांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मासिक 80 हजार मानधनावर 60 एमबीबीएस, 60 हजार मानधनावर 30 बीएएमएस, 50 हजार मानधनावर 30 बीएचएमएस डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MP naresh Mhaske and MP Shrikant Shinde
Anna Bansode
Local Trains Late Every Day Banner Near Kopar Station
csmt railway station
Marathi News Esakal
www.esakal.com