

Dr Ananda Shankar Jayant And Professor Reza Baba Say Art Is The Soul Of Culture And An Essential Part Of Heritage
sakal
मुंबई: ‘‘नृत्यकलेकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता, त्याकडे शिक्षणाचे एक साधन म्हणून पाहणे आवश्यक आहे. कला हा संस्कृतीचा आत्मा आहे,’’ असे मत प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. आनंदा शंकर जयंत यांनी व्यक्त केले. एपी ग्लोबालेच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २’मध्ये शनिवारी आयोजित ‘मूव्हमेंट ॲज मेमरी’ या संकल्पनेवर आधारित चर्चासत्रात त्या बोलत होत्या.