२२ दिवसानंतर प्रभाकर साईलची भाषा कशी बदलली? भाजपाचा सवाल

"त्याचा फोन रेकॉर्ड, लोकेशन या सगळ्याची सीबीआय चौकशी होईल तेव्हा सत्य समोर येईल"
Sameer Wankhede
Sameer WankhedeTeam eSakal

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan khan drug case) प्रभाकर साईलने (prabhakar sail) २५ कोटी डीलचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना सुरु झाला आहे. "ड्रग्ज प्रकरणात अचानकपणे प्रभाकर साईलला कोणी समोर आणलं? २२ दिवसानंतर त्याची अचानक भाषा कशी बदलली? महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra govt) कोणत्या महान नेत्याचा हात त्याच्यामागे मागे आहे? कोणाच्या दबावामुळे साईलची भाषा बदलली? या सगळ्याची सीबीआय (cbi) मार्फत चौकशी होणं आवश्यक आहे" असं भाजपा आमदार राम कदम म्हणाले.

"मागच्या २२ दिवसापासून कोणत्या नेत्याच्या संपर्कात होता. त्याचा फोन रेकॉर्ड, लोकेशन या सगळ्याची सीबीआय चौकशी होईल तेव्हा सत्य समोर येईल" असे राम कदम म्हणाले.

Sameer Wankhede
२५ कोटी डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलला पोलीस संरक्षण

"महाराष्ट्र सरकार आणि नेते एनसीबीला मदत करायची सोडून, ड्रग्ज माफीयांचं अप्रत्यक्ष समर्थन का करत आहेत?" असा सवाल राम कदम यांनी विचारला. तिथूनही हफ्ता वसुली होतेय? यामागचं सत्य जनतेसमोर येईल" असं राम कदम म्हणाले.

Sameer Wankhede
"हा समाजच त्या लायकीचा नाही.."; वानखेडेंच्या पाठिशी उभा राहिला अभिनेता

"महाराष्ट्र सरकार कडून अपेक्षा करणे निरर्थक आहे. म्हणूनच CBI ने याची चौकशी करावी. अन्यथा देशातील प्रमाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल" असे राम कदम यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com