esakal | आसाम-मिझोराम सीमावादात पोलीस अधीक्षक जखमी; रुग्णालयात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

vaibhav nimbalkar

आसाम-मिझोराम सीमावादात पोलीस अधीक्षक जखमी; रुग्णालयात दाखल

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : आसाम-मिझोराम सीमेवर (Assam-Mizoram border) झालेल्या वादात पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर (SP Vaibhav nimbalkar) जखमी झाले होते. त्यांच्यावर मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन रुग्णालयात (kokilaben hospital) सध्या उपचार सुरु आहेत. ( Assam mizoram border issue sp vaibhav nimbalkar injured hospitalized in kokilaben - nss91)

2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांना एरलिफ्ट करून मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले होते. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना ते चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्या नातेवाईकानी सांगितले. वैभव निंबाळकर यांचे मेहुणे सुकीर्त घुमस्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वैभव यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या डाव्या पायाला गोळी लागली होती. ती काढण्यात आली असून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्‍हणून डाॅक्टरांची टीम काम करत आहेत. ते हालचाल ही करत आहेत.

हेही वाचा: Mumbai University : विधी शाखेचा निकाल जाहीर, जाणून घ्या सविस्तर

ईशान्येकडील आसाम आणि मिझोराम या राज्यांमधील सीमासंघर्ष सोमवारी अधिकच चिघळला. आसामच्या सीमेवरील कचार जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत आसाम पोलिस दलातील सहा पोलिस ठार झाले. यात पोलिस शिपाई आणि मूळचे महाराष्टातील असलेले पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर हे देखील यामध्ये जखमी झाले होते. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली.

loading image
go to top