
ठाणे : ‘माईक हा माझ्यासाठी देव आहे. प्रत्येक गाणे आजही पहिल्यासारखे गाते. मला काम नसेल तर मी जगू शकत नाही. त्यामुळेच अजूनही गात आहे. मी कोणाकडे काहीही मागितले नाही. आतापर्यंत मिळालेले पुरस्कार माझ्या कर्तृत्वाने मिळाले आहेत. रसिक प्रेक्षकांनी इतके प्रेम दिले, की तेच आपल्यासाठी ‘भारतरत्न’ आहे,’ अशी भावना आशा भोसले यांनी ठाणे येथील कार्यक्रमात शनिवारी व्यक्त केली.