
उल्हासनगर : गेल्या काही महिन्यांपासून मानधना पासून वंचीत ठेवण्यात आल्याने उल्हासनगरातील आशा स्वयंसेविकांनी नेमक्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच सावित्रीबाईचे मुखवटे परिधान करून महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता.या मोर्चाची गांभीर्याने दखल घेणाऱ्या आयुक्त मनीषा आव्हाळे ह्या स्वयंसेविकांच्या मानधनाच्या मदतीला धावून आल्याने 225 आशा स्वयंसेविकांच्या खात्यात 5 महिन्यांचा एकत्रित धनादेश जमा करण्यात आला आहे.