''राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या ठाकरे सरकारची घमेंड जनता उतरवेल''

''राज्यपालांना विमानातून उतरवणाऱ्या ठाकरे सरकारची घमेंड जनता उतरवेल''

मुंबई: योग्य परवानगी घेऊन महामहिम राज्यपाल राज भवनावरुन ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानतळावर विमानात गेल्यानंतर त्यांना उतरवलं गेले. आज महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलेय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल असा घणाघात अँड आशिष शेलार यांनी केला.

राज्यपाल हे संविधानिक या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी हे सरकार असे वागत असेल तर अन्य लोकं कशी व्यवस्था ठेवणार? राज्यभर अव्यवस्था निर्माण करायची, कुठलीही व्यवस्था योग्य रीतीने चालू द्यायचीच नाही, अशा पद्धतीचा कारभार पहिल्या दिवसापासून हे महाराष्ट्र विकास आघाडीचे ठाकरे सरकार करते आहे. 

राज्यातील ठाकरे सरकारला केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे नकोत. अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्व प्रकल्प नकोत. अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विधान सभेने घेतलेल्या निर्णयाला यांनी तिलांजली दिली. केंद्र सरकारच्या चौकशीच्या एजन्सीना महाराष्ट्रातील केसेस हे देणार नाहीत. चौकशीच्या केंद्राच्या रचना योजनांच्या एजन्सिज यांना महाराष्ट्रमध्ये पाय ठेवू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आदेश यांना पाळायचे नाहीत. राज्यपाल महोदयांवर हिन दर्जाची टीकाटिप्पणी हेकरतात आणि आता तर राज्य सरकारने राज्यपालांचा अपमान करू या पद्धतीचे धोरण घेतलेय. या धोरणामुळे राज्यात असलेल्या सरकारी पक्षांना राजकीय अभिनश्वेषाचे प्रेम जरूर वाटत असेल पण या त्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशभरामध्ये या ठाकरे सरकारने केली आहे असे शेलार पुढे म्हणाले.

विशेषता ज्या महाराष्ट्रात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या बाबासाहेबांनी प्रथा-परंपरा संविधान, नियम नियमावली  संसदीय लोकशाही दिली. त्या महाराष्ट्राने या सगळ्या संविधानिक पदाचा अवमान करणे म्हणजे बाबासाहेबांच्या मार्गावर आम्ही चालायला तयार होत नाही, हे दाखवण्यात येते आहे. अपमान केला जातोय. देशभर महाराष्ट्राची बदनामी केली जातेय याबाबत ही शेलार यांनी नाराजी व्यक्त केली.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Ashish shelar cirtcism thackeray government for denied state plane fly Uttarakhand

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com