बालपणाच्या मित्राने केली मटका किंग जिग्नेश ठक्करची हत्या; कार्यालयातून बाहेर पडताना बेछूट गोळीबार

सुचिता करमरकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर परिसरातील मटकाकिंग जिग्नेश ठक्कर याची त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर परिसरात मटकाकिंग  जिग्नेश ठक्कर ( 43) याची त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जिग्नेश हा शुक्रवारी रात्री उशिरा  कार्यालयातून बाहेर पडत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करत त्याची हत्या केली. इस्पितळात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जिग्नेशचा बालपणीचा मित्र धर्मेश ऊर्फ नन्नू नितीन शहा, जयपाल उर्फ जापान आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात महात्मा फुले पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जुना आर्थिक वाद तसेच काही तात्कालिक कारणावरून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. 

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सुयश प्लाझा येथे जिग्नेश ठक्कर याचे कार्यालय आहे. याच ठिकाणाहून तो रात्री  घरी जाण्यास निघाला असताना त्याच्यासवर  धर्मेश आणि जयपालने गोळ्या झाडल्या. यात त्याला पाचपैकी चार गोळ्या लागल्या आहेत. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. महात्मा फुले पोलिसांनी या संदर्भात तपास सुरु केला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या परिसरात जिग्नेश मटकाकिंग म्हणून कुख्यात होता. क्रिकेटवर सट्टा लावण्याबाबतही त्याच्यावर पोलिसांचा संशय होता.

मटका किंग जिग्नेश ठक्करची हत्या; कार्यालयातून बाहेर पडताना बेछूट गोळीबार

 जिग्नेश आणि धर्मेश बालपणापासूनचे मित्र होते. या दोघांवरही विविध पोलिस स्थानकात खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. 29 जुलैला धर्मेशचा मित्र चेतन पटेल याच्याबरोबर जिग्नेशची शाब्दिक चकमक झाली होती. यासंदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मेश आणि जयपालसह अन्य दोन जणांनी अचानक जिग्नेशवर गोळीबार केला. 'कोई बीच मे आया तो ठोक देंगे' अशा शब्दात त्यांनी साक्षीदारांना ही धमकी दिली. महात्मा फुले पोलिसांनी याप्रकरणी पाच तपास पथके विविध ठिकाणी रवाना केली आहेत.

एक चूक पडली सव्वा दोन लाखाला; अनोळखी व्यक्तीला 'ओटीपी' सांगण्याची चुक अजिबात करू नका

कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील बोरगावकर गल्ली परिसरात जिग्नेश  याचे कार्यालय आहे. याच ठिकाणाहून रात्री तो घरी जाण्यास निघाला होत. त्याच्यावर झाडण्यात आलेल्या  पाचपैकी चार गोळ्या त्याला लागल्या आहेत.  
 तपासासाठी पोलिसांनी तीन पथके विविध दिशांना रवाना केली आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या परिसरात जिग्नेश मटकाकिंग म्हणून प्रसिद्ध होता. क्रिकेटवर सट्टा लावण्याबाबतही त्याच्यावर पोलिसांचा संशय होता. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे स्पष्ट होऊ शकले नाही. दोन किंवा तीन हल्लेखोरांनी जिग्नेशवर गोळीबार केला असावा असे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assassination of Matka King Jignesh Thakkar; Unprovoked shooting on the way out of the office