सात वर्षापुर्वीं झालेला लैंगिक अत्याचार उघड; मानसोपचारादरम्यान अंध पिडितेची तक्रार 

अनिश पाटील
Friday, 25 December 2020

अंध मुलीच्या वागण्यातील बदलामुळे कुटुंबियांनी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी नेले असता मुलगी अल्पवयीन असताना तिच्या अंधत्त्वाचा फायदा उचलून नातेवाईकांनीच लैंगिक अत्चाचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मुंबई  : अंध मुलीच्या वागण्यातील बदलामुळे कुटुंबियांनी तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी नेले असता मुलगी अल्पवयीन असताना तिच्या अंधत्त्वाचा फायदा उचलून नातेवाईकांनीच लैंगिक अत्चाचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरोपींनी पुन्हा तिला लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिल्यानंतर मुलगी तणावाखाली आली होती. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पीडित मुलगी नागपाडा परिसरातील रहिवासी आहे. आरोपींनी नुकतेच तिला पुन्हा लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तणावाखाली आलेली मुलगी स्वतःलाच मारून घेत व केस उपटू लागली होती. अखेर कुटुंबियांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले असता हा प्रकार समोर आला. पीडित मुलगी सध्या 24 वर्षांची आहे. चौकशीनूसार, ती 17 वर्षांची असताना 2013 मध्ये तिच्यावर वहिनीचा भाऊ व एका मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाली. त्यात तिच्या वहिनीनेही आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे. आरोपींनी तिला मारहाण व धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित मुलीची वहिनी, तिचा भाऊ व भावाचा मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांना आवळा, उद्योजक मित्रांना कोहळा! बाळासाहेब थोरात यांचा घणाघात

कौटुंबिक वादातून प्रकार 
पीडित मुलीचा भाऊ व तिच्या वहिनीमध्ये भांडण होते. त्यातून या वहिनेने तिच्या कुटुंबीयांवर हुंडाबळी, बलात्काराची तक्रार केली होती. त्याप्रकरणी कुटुंबियांना अटक झाली होती. नुकतेच या वादातून आरोपींनी पुन्हा या मुलीला 2013 प्रमाणे आताही लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली होती.

assault seven years ago exposed Complaint of a blind victim during psychiatry

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assault seven years ago exposed Complaint of a blind victim during psychiatry