जिल्हाधिकाऱ्याच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मुंबई : रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने पूरग्रस्त भागातील जनावरांना एक वेगळ्या पद्धतीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रायगड जिल्ह्यातून एकूण 107 टन ओला चारा व पेंडा पुरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी श्रमदान मोहिमेत सहभाग घेऊन चारा कापून ओला चारा गोळा केला. यामध्ये जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनीही स्वतःहून सहभाग घेतला होता. 

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात गुरांना चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे याकरिता रायगड पशुसंवर्धन विभागात, पशुचिकित्सा व्यावसायी संघटना; तसेच रायगड जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्‍यातील सहाण गावातील 15 टन हिरवा चारा कर्मचाऱ्यांनी कापून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पाठविला. जिल्ह्यातून माणगाव 12 टन, अलिबाग 60 टन, पेण 15 टन, पोलादपूर 10 टन, मुरूड 10 टन असा एकूण 107 टन चारा व पेंडा पूरग्रस्त भागात पाठविण्यात आला आहे.  

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते चारा कापण्याची सुरुवात करण्यात आली. या वेळी उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, डॉ. बी. डुबल, सरपंच विश्वनाथ गावंड, उपसरपंच जहिन्द्र पाटील, माजी सरपंच मंगेश पाटील, विजय पाटील उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistance to the flood victims in the district's initiative