खतरनाक! वसईच्या खड्ड्यांमध्ये अवतरले `अंतराळवीर` 

विजय गायकवाड 
Sunday, 30 August 2020

वसई-विरार, नालासोपारा शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्त्यावर दोन फुटांचे खड्डेच खड्डे झाले आहेत. रस्त्यातून वाहन चालवणे ही मोठी कसरत झाली आहे. त्यामुळे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क मनसेचे "अंतराळवीर' पीपीई कीट घालून वसईच्या कामन भिवंडी रोडवरील खड्ड्यांमध्ये उतरले. 

नालासोपारा : वसई-विरार, नालासोपारा शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्त्यावर दोन फुटांचे खड्डेच खड्डे झाले आहेत. रस्त्यातून वाहन चालवणे ही मोठी कसरत झाली आहे. त्यामुळे या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी चक्क मनसेचे "अंतराळवीर' पीपीई कीट घालून वसईच्या कामन भिवंडी रोडवरील खड्ड्यांमध्ये उतरले. 

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनधारक त्रस्त असतानाही वसई विरार महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त असल्याचा आरोप करत मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वसईच्या कामन भिवंडी रोडवरती पीपीई किट आणि पांढऱ्या रंगाचे हेलमिट घालून मनसे कार्यकर्त्यांनी चक्क चंद्रावर जाण्याचाच प्रतिकात्मक अनुभव घेतला. 
शहरातील खड्डया बुजविण्यासाठी मनसेच्या पदाधिकारीऱ्यांनी प्रशासनाला मागणी केली. मात्र या मागणीकडे प्रशासनाने कानाडोळा करत असल्याचा आरोप करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एकीकडे नासा आणि इस्त्रे चंद्रावर पाणी शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

 आणि दुसरीकडे वसई विरारमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांतच जेवढे पाहिजे तेवढे साचलेले पाणी दिसत आहे. चंद्रावर जायचे असले तर वसई विरारमधील रस्त्यांवर चालून तो अनुभव घेता येईल. 
असा टोला मनसेने प्रशासनाला लागवला आहे. तर दर वर्षी रस्ते दुरुस्तीसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद पालिका प्रशासन करते मात्र या वर्षी दहा टक्के सुद्धा काम केले नाही, असा आरोप मनसेचे माजी नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांनी केला आहे. 

( संपादन ः रोशन मोरे)

astronauts unique movement mns vasai city


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: astronauts unique movement mns vasai city?ams