संशयित वितरकाला पकडण्यासाठी गेलेल्या NCBच्या पथकावर हल्ला

संशयित वितरकाला पकडण्यासाठी गेलेल्या NCBच्या पथकावर हल्ला

मुंबई: संशयित ड्रग्स वितरकाला पकडण्यासाठी गोरेगाव येथे गेलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एनसीबी) अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले आहे. एनसीबी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे.

एनसीबीचे अधिक्षक विश्वविजय तेजपाल सिंग(36) यांचे पथक गोरेगाव येथे संशयित एलएसडी तस्कर केरी मेंडीस याला पकडण्यासाठी गेले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला घेऊन जात असताना गोरेगाव पश्चिम येथील जवाहर हॉल येथील जैन मेडिकलजवळ टोळक्याने त्यांना रोखले. आपण कौन है, पुलिस है क्या, ऐसे केसे किसी को लेके जा सकते है, असे बोलू लागले. सिंग यांच्या पथकाने त्यांना आपण एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकले नाही. त्यांनतर या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात सिंग यांच्यासह त्यांचा साथीदार कॉन्स्टेबल शिवा रेड्डी हे जखमी झाले आहेत. कॉन्स्टेबलला जबर मारहाण करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

याप्रकरणी सिंग यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी 353, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गोरेगाव पोलिसांनी विपुल कृष्णा आगरे(25), युसुफ आमीन शेख(24) आणि आमीन अब्दुल लतीफ शेख(44) यांना ताब्यात घेतले आहे. यातील युसुफ आणि आमीन दोघे पिता-पुत्र आहे. तर एक आरोपी मर्चन्ड नेव्हीमध्ये कामाला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिन्याभरापासून एनसीबी बॉलिवूडला ड्रग्स पुरवणाऱ्या वितरकांवर कारवाई करत आहे. त्या अंतर्गत गोरेगाव येथे वितरकाला पकडण्यासाठी गेले होते.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Attack NCB squad Mumbai one injured along with officer Sameer Wankhede

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com