मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

मुंबई :मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. धुळ्याचे बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला असून,पोलिसांनी वेळीच बबन झोटे यांना ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

आज सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे. बबन झोटे हे धुळे नगर पालिकेतील कर्मचारी होते.धुळे नगरपालिका असताना १९८९ साली झालेल्या नोकर भरती प्रक्रियेची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी लेखी मागणी त्यांनी केली होती.अन्यथा मंत्रालयाच्या कोणत्याही प्रवेद्वाराजवळ आत्महत्या करू, याला धुळे महानगरपालिका जबाबदार असेल असा इशारा झोटे यांनी दिला होता.यावर काहीच कार्यवाही न झाल्याने झोटे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.

Web Title: attempt to suside infromt of minsitry office