'महाविकास आघाडीत कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न'! कॉंग्रेसनेत्याचे थेट सोनिया गांधींना पत्र

'महाविकास आघाडीत कॉंग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न'! कॉंग्रेसनेत्याचे थेट सोनिया गांधींना पत्र
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील नेते, मुंबईतील काँग्रेसचे महासचिव विश्वबंधु राय यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी लावला आहे. 

मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस राय म्हणालेत की, महाराष्ट्रातील MVA सरकारचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. यावेळी कॉंग्रेस पक्ष राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष म्हणून कायम आहे. महाराष्ट्रात सरकार चालवण्याच्या भूमिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढे असल्याचं दिसत आहे. पत्रात ते हेही म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काँग्रेसला एका वाळवीसारखा राज्यात कमकुवत करतोय 

पुढे राय म्हणतात, महाराष्ट्र सरकारमध्ये काम करताना कॉंग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना कोणतेही महत्त्वाचे काम मिळत नाही. सर्वसाधारण जनता तसेचकाम  कार्यकर्त्यांना मंत्र्यांचा विभाग माहित नाही. आपले मित्रपक्ष रणनीती बनवून आमच्या पक्षाला त्रास देत आहेत आणि त्यांच्या पक्षाला पुढे नेण्यात ते गुंतले आहेत.

कॉंग्रेस सरचिटणीस यांनी सोनिया यांना लिहिलेल्या पत्रात ते असं देखील म्हणतात की, आम्ही हे थांबविण्यात अपयशी ठरलो आहोत. कॉंग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला दिलेल्या आश्वासनांवर कोणतेही काम झालेले नाही. पक्षातून स्थलांतर रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत.

Attempts to weaken the Congress in the Mahavikas aghadi gov congress leader written latter to sonia gandhi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com