रेल्वे प्रवासी संघटनेचे उद्याच्या निर्णयाकडे लक्ष; लोकल सुरू न केल्यास आंदोलनाची तयारी 

कुलदीप घायवट
Monday, 11 January 2021

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याबाबत राज्य सरकारकडून मंगळवारी (ता. 12) निर्णय घेण्यात येण्याची शक्‍यता आहे

मुंबई  : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याबाबत राज्य सरकारकडून मंगळवारी (ता. 12) निर्णय घेण्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनांचे याकडे लक्ष लागून आहे. हा निर्णय नकारात्मक लागल्यास आंदोलनाची रूपरेषा ठरवून आंदोलन छेडले जाणार आहे, अशी भूमिका उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ)च्या वतीने मांडण्यात आली. 

 

रेल्वे प्रवासी आणि रेल्वे संघटनेकडून समाजमाध्यमांवरून सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. राज्य सरकारलाही पत्रव्यवहार करण्यात येत होता; मात्र राज्य सरकारकडून 15 डिसेंबर, 1 जानेवारी अशा तारखा देऊन चालढकल केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार होते; मात्र आता मंगळवारच्या निकालाची प्रतीक्षा सुरू आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

या निर्णयावर आंदोलन करायचे की नाही, हे अवलंबून आहे, असे उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ)चे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. सर्वसामान्यांना सकाळी 7 च्या आधी आणि रात्री 10 च्या नंतर प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने देऊ नये. प्रवाशांना संपूर्ण वेळ प्रवास करण्याची मुभा द्यावी किंवा सकाळी-सायंकाळी प्रवास करण्याची वेळ द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. 

Attention to the Railway Passengers Associations decision tomorrow in mumbai

--------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attention to the Railway Passengers Associations decision tomorrow in mumbai