esakal | 'ठाकरे सरकारमध्ये अशाच नमुन्यांची भरमार'; धनंजय मुंडे प्रकरणी भाजप नेत्याची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'ठाकरे सरकारमध्ये अशाच नमुन्यांची भरमार'; धनंजय मुंडे प्रकरणी भाजप नेत्याची टीका

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या आरोपानंतर भाजपनेत्यांनी त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे

'ठाकरे सरकारमध्ये अशाच नमुन्यांची भरमार'; धनंजय मुंडे प्रकरणी भाजप नेत्याची टीका

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार त्यांनी मुंबई पोलिसात केली आहे. मुंडे यांनीदेखील आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करीत स्पष्टीकरण दिले आहे. याप्रकरणी भाजपनेते अतुल भातखळकर यांनी मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले. परंतु विरोधकांनी त्यांच्यावर टीका करीत त्यांच्या राजीनाम्यांची मागणी केली आहे. भाजपनेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील मुंडे यांच्याबाबत ट्विट करत म्हटले की, ' दुसरी पत्नी व अपत्यांबाबतची माहिती, त्यांच्यावर केलेला खर्च निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याबद्दल सामाजिक न्याय (???) मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी असे पत्र मी निवडणूक आयोगाला लिहिले आहे... ठाकरे सरकार मध्ये अशाच नमुन्यांची भरमार आहे ' 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे प्रकरण? 
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने 10 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. तक्रारदार महिलेने तक्रारीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी याची दखल घेतली असून, आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याविषयावर खुलासा केला आहे. संबंधित महिलेच्या बहिणीशी 2003पासून सहमतीने संबंध होते. त्यातून एक मुलगा आणि मुलगी अशी मुलेही झाली. त्यांना माझे नाव दिले असून, त्यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या कुटुंबियांना आणि मित्र परिवारालाही हे महिती असून, त्यांनी मुलांचा स्वीकारही केला आहे, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेजवर शेअर केली आहे.

Atul Bhatkhalkars criticism of Dhananjay Munde

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image