चला सुरू करू ‘ऑडिओ बुलेटिन’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण देण्याच्या युगात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षक उपयोग करत आहेत.

माणगाव (बातमीदार) : ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण देण्याच्या युगात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षक उपयोग करत आहेत. या शिक्षण क्षेत्र यामुळे अधिक गतिमान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याने ‘शिक्षक रेडिओ ऑडिओ बुलेटिन’ नावाची संकल्पना राबवण्यात येत आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह्याने जिल्ह्यातील अनेक शाळा स्मार्ट झाल्या आहेत. अध्ययन अध्यापनात यू-ट्युब, व्हॉट्‌सॲप इत्यादीद्वारे शैक्षणिक माहिती, उपक्रमांची देवाणघेवाण होत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जिवंत अनुभवाद्वारे अध्यापन करण्याच्या हेतूने शिक्षक विविध उपक्रम राबवत असतात. या विद्यार्थी प्रगत करण्याच्या हेतूतूनच शिक्षकांनी आंतरजालाच्या माध्यमातून समूहाचे ‘शिक्षक रेडिओ ऑडिओ बुलेटिन’ नावाची संकल्पना राबवण्यास सुरू केली आहे. व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून शिक्षक त्या त्या दिवसाचे दिनविशेष, शैक्षणिक माहिती प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रेडिओद्वारे दररोज प्रसारित करतात. यासाठी शिक्षक समूहातून प्रगल्भ ज्ञान असणारे, सुयोग्य आवाज व बातम्या देण्यासाठीची जाण असणारे शिक्षक पुढे सरसावले आहेत. आपल्या लयबद्ध व खणखणीत आवाजातून त्या त्या दिवसाची माहिती, ज्ञानरंजक पद्धतीने रेडिओद्वारे प्रसारित करत आहेत.

या ओझ्याखाली दबली नवी मुंबई महापालिका

या रेडिओ बुलेटिनला शिक्षक, विद्यार्थी व पालकांची, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची चांगली पसंती मिळत आहे. अनेक शाळांतून हे रेडिओ बुलेटिन दररोज ऐकवले जात असते. आधुनिक युगातील हे ज्ञानरंजक शैक्षणिक साहित्यामुळे ज्ञानरचनावादी पिढी घडून देशाची उन्नती होईल, असा विश्वास शिक्षक, पालक व्यक्त करत आहेत.

आंतरजालाचा दुवा वापरून हे ऑडिओ माहितीचे प्रसारण केले जाते. अनेक शाळांतून तंत्रज्ञानस्नेही शिक्षक विद्यार्थ्यांना ही माहिती व बातम्या ऐकवत असतात. माहिती व बातम्या ऐकल्यावर यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि माहितीचे दृढीकरण केले जाते.

ओल्‍या काजू बियांसाठी म्हणून थोडे थांबा

अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम असून, या बुलेटिनद्वारे नवनवीन माहिती व संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे. जिल्ह्यातील शिक्षक ज्ञानरचनावादी शिक्षणात अग्रेसर असल्याचे यातून दिसते. या संकल्पनेतून दिनविशेष व माहिती रेकॉर्ड करून आंतरजालाचा उपयोग करून समाजमाध्यमांवर हा दुवा प्रसारित केला जातो. विद्यार्थी व शिक्षणप्रेमींना यानिमित्ताने चांगली माहिती मिळत आहे.
- अपर्णा जंगम मॅडम, तंत्रज्ञानस्नेही शिक्षिका, माणगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Audio Bulletin in School