लॉक डाऊनमध्ये उन्हातान्हात एका रिक्षात चढले खरे, पण पुढे रिक्षाचालकाने...

शर्मिाला वाळुंज
मंगळवार, 5 मे 2020

डोक्यावर तळपता सूर्य, सुमसाम आणि तापलेल्या रस्त्यावरील अंतर कापताना अगदी नकोसे होऊन जाते. अनेक दिवस सामसूस असलेल्या रस्त्यावर रिक्षा दिसली आणि प्रवाशांना हायसे वाटले.

ठाणे - डोक्यावर तळपता सूर्य, सुमसाम आणि तापलेल्या रस्त्यावरील अंतर कापताना अगदी नकोसे होऊन जाते. अनेक दिवस सामसूस असलेल्या रस्त्यावर रिक्षा दिसली आणि प्रवाशांना हायसे वाटले. त्यांनीही पायी चालण्याऐवजी रिक्षाचा पर्याय स्विकारला. परंतू इच्छित ठिकाणावरुन माघारी लगेच येणार नसल्याने नाईट चार्ज म्हणजेच दुप्पट भाडे आकारत रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत असल्याचे प्रवाशांनी अनुभवावरुन सांगितले. तर दुसरीकडे केवळ रुग्णांच्या सेवेसाठी रिक्षा सुरु असून इतर प्रवाशांच्या प्रवासास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन कोणीही करत नसल्याचे पोलिस प्रशासन सांगते. 

संचारबंदीमुळे शहरात शुकशुकाट असला तरी अत्यावश्यक सेवेत मोडणारे कर्मचारी रणरणत्या उन्हात पायी चालत जात असलेले दिसून येतात. कामाच्या ठिकाणी पोहोचविणारी गाडी ही स्टेशन परिसरात मुख्यतः येत असल्याने अनेकांना तिथपर्यंत पायपीट करतच जावे लागत आहे. कडाक्याच्या उन्हात रस्त्यावरील अंतर कापणे म्हणजे नकोसे वाटत असतानाच विभागात रिक्षा दिसताच प्रवाशांनी रिक्षाचा प्रवास मार्ग स्विकारला. रिक्षाचालकांनीही त्याचा फायदा घेत पुन्हा फेरी नसेल तर नाईट चार्ज म्हणजेच दुप्पट भाडे द्यावे लागेल असे सांगत त्यांना सेवा दिली. हे रिक्षाचालक प्रवाशांची नोंद ठेवत नसल्याने काही प्रवाशांनी त्यांना ऑन कॉलची रिक्षा आहे ना अशी विचारणा करता त्यांनी नाही. लोकप्रतिनिधींच्या परवानगीने अत्यावश्यक सुविधेसाठी सुरु केली असल्याचे सांगितले.  

शक्तिमान, सुपरमॅन, अवेन्जर्स त्यांनतर 'हे'च... पोलिसही राहिलेत बघत !

लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक प्रसंगी रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना वाहनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून पालिका आयुक्त व उप प्रादेशिक परिवहन अधिाकरी यांच्या आदेशानुसार शहरात ऑन कॉल रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे. या रिक्षाचालकांची नोंद परिवहन विभागाकडे असून रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या वाहतूकीची नोंदवहीत नोंद दिनांकानुसार ठेवायची असून ती नंतर पालिका प्रशासन, आरटीओ व पोलिस यांनी मागितल्यावर उपलब्ध करुन द्यायचे आदेश देण्यात आले आहेत. काही भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेथेही रुग्णांसाठी रिक्षांची सुविधा देण्यात आल्याचे पोलिस सांगतात. परंतू हे रिक्षाचालक रुग्णांव्यतिरिक्तही प्रवाशांची वाहतूक करीत असून त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारुन त्यांची नोंदही ठेवत नाही. म्हात्रे नगर ते स्टेशन 20 रु. भाडे असून रिक्षाचालकांने त्यांच्याकडून 40 रुपये भाडे आकारले गेले. तसेच आयरे गाव ते डोंबिवली विभागीय कार्यालय 30 रु. भाडे आकारतात त्यांच्याकडून 60 रु. भाडे आकारण्यात आल्याचे प्रवाशांनी अनुभवावरुन सांगितले. 

मुंबईत येणार कोरोनाचा स्पाईक? मुंबईत पालिकेकडून 'या' नव्या ठिकाणी आयशोलेशन बेड्स तयार...

प्रवाशांना सुविधा देणे योग्य, परंतू केवळ रुग्णांसाठी त्या आहेत याची आम्हाला कल्पनाच नव्हती. रिक्षाचालकांनी आम्हाला तशी कल्पना द्यायला हवी. त्यारिक्षातून कोणी कोणी प्रवास केला असेल याची काहीच माहिती रिक्षाचालकास नाही. उन्हाचा तडाखा वाढत असल्याने सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत असून त्यांनाही सुविधा द्यावी अशी मागणीही हे कर्मचारी करतात. 

काही भागात रुग्णांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रिक्षांची सुविधा देण्यात आली आहे. परंतू रिक्षाचालकांनी प्रत्येक प्रवाशाची नोंद ठेवणे आवश्यक आहे. इतर प्रवाशांचे भाडे आकारण्यास परवानगी नाही. नियमांचे कोणीही उल्लंघन करणार नाही याकडे लक्ष दिले जात आहे. - सतेज जाधव, डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक. 

auto drivers are taking night charges during days of lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auto drivers are taking night charges during days of lockdown