मुंबई - उपनगरी गाड्यांमधून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशांना गर्दीमुळे दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे सोमवारी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या समस्येवर उपाय म्हणून रेल्वे मंडळाने लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.