मराठीच्या संवर्धनासाठी पुरस्कार विजेत्यांनी मार्गदर्शक व्हावे; सुभाष देसाई

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 28 January 2021

मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

मुंबई  : मराठी भाषेतील साहित्य निर्मीतीतील योगदानाबद्दल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांनी मराठी भाषेच्या संवर्धन व वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता आज झाली. त्यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या 34 पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली. 

यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे, कला शिक्षक गोपाल वाकोडे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीत डिसले उपस्थित होते. 
देसाई पुढे म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी, यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आवश्‍यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन परस्परसंवादी पुस्तकांची निर्मीती व्हावी. मराठीचे संवर्धनच नव्हे; तर मैत्रीपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा वृद्धींगत होणे गरजेचे आहे. 
पंधरवडाच्या सुरवातीला मांडलेली मंत्रालयातील लेखकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाची संकल्पना प्रत्यक्षात लोकांच्या पसंतीस उतरली आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेतुन स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणारे कला शिक्षक वाकोडे गुरुजी यांचेही काम उल्लेखनीय आहे, असे ते म्हणाले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

नविन शब्दांचा समावेश करावा : रणजीत डिसले 
सन 2020 चे वैश्विक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले यांनी यावेळी मराठी भाषा पंधरावडा यामध्ये सुधारणा करुन तो मराठी भाषा वृद्धीगंत पंधरवडा करावा, अशी सूचना केली. समाज माध्यमावर मराठी भाषेचे चाहते कमी असून समाजमाध्यमावर मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त केला जावा. तसेच नवीन शब्दाचा मराठी भाषेमध्ये वापर करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. 

Award winners should be guides for the promotion of Marathi Subhash Desai

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Award winners should be guides for the promotion of Marathi Subhash Desai