‘स्वच्छ भारत मिशन’ची एलईडी स्क्रीनद्वारे जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पालघर ः महाराष्ट्र सरकार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यात स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी एलईडी स्क्रीन असलेली स्वच्छता व्हॅन पाठवण्यात आली आहे. या स्वच्छता व्हॅनचे उद्‌घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रकांत वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फीत कापून केले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग तुषार माळी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

ग्रामीण भागात स्वच्छतेविषयी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून या व्हॅनचा वापर होणार आहे. हागणदारीमुक्त गावे, घन कचऱ्याचे व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण याबाबत मार्गदर्शन, संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेविषयी माहिती देणारे संदेश या व्हॅनवर लावण्यात आलेले आहेत. 

एलईडी व्हॅन स्क्रीनच्या माध्यमातून ग्रामीण सार्वजनिक स्वच्छतेविषयी भारूड, गवळण, नाटिका, लघुपट, गाणी दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे. व्हॅन जिल्ह्यातील एकूण १५० गावांमधील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आठवडी बाजार, यात्रा, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी जाऊन जनजागृती करणार आहे, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness through the LED screen of 'Swachh Bharat Mission' in palghar