Badlapur Incident : उल्हासनगर बंदच्या तयारीसाठी पप्पू कालानी, टीम ओमी कालानी यांची उपस्थिती; रिपाइं आठवले गटाचाही पाठींबा

बदलापूर मधील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
Pappu kalani
Pappu kalanisakal
Updated on: 

उल्हासनगर - बदलापूर मधील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेने सर्वत्र संतापाचे वातावरण पसरले आहे. महाविकास आघाडीने या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ उद्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याच्या तयारीसाठी उल्हासनगरात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत माजी आमदार पप्पू कालानी, टीम ओमी कालानी उपस्थित होते. या बंदला रिपाइं रामदास आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनीही पाठींबा जाहीर केला आहे.

Loading content, please wait...