esakal | बदलापूर, कर्जतमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांची परवड

बोलून बातमी शोधा

remdesivir 2.jpeg

रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झालंय.

बदलापूर, कर्जतमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांची परवड
sakal_logo
By
सुमित सावंत

ठाणे: मुंबई: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूर, मुरबाड, कर्जत, खोपोली आणि आजू बाजूच्या परिसरातून रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झालंय. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना पनवेल, ठाणे गाठावं लागतंय. बऱ्याचदा या परिसरात देखील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची परवड होतेय. या आधी शासकीय कोविड केंद्रात हे इंजेक्शन मोफत उपलब्ध होत होतं, पण आता या केंद्रांनाच पैसे देऊन देखील हे इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती समोर येतेय.

प्राणवायूची कमतरता
बदलापूर , कर्जत , खोपली आणि परिसरात रुग्णांची संख्या कमालीची वाढतेय. या परिसरात शासनाने रुग्णांसाठी केलेली व्यवस्था अपुरी पडतेय. खाटा, विशेषतः अतिदक्षता विभागात खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना या खाटा मिळवण्यासाठी वाट पाहावी लागतेय. काल इथल्या शासकीय कोविड केंद्रात काही काळासाठी प्राणवायूचा पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे .

'रेमडिसिव्हिर'च्या वक्तव्यावरून दरेकरांनी घेतला भुजबळांचा समाचार

बदलापुरात व्यवस्था तोकडी
बदलापूर मधील गौरी हॉल मध्ये २५० रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था आहे. मात्र इथे सगळ्याच खाटा पूर्ण भरलेल्या आहेत. तर ६० अतिदक्षता विभागात खाटा आहेत. त्या देखील पूर्ण भरल्या असल्यामुळे नव्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागात खाटा मिळत नाहीयत.  खासगी रुग्णालयात देखील तीच स्थिती आहे. त्यामुळे मुंबई पासून एवढ्या जवळ असलेल्या परिसरात ही भीषण स्थिती असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना काय उपचार मिळत असतील हे स्पष्ट होतंय .

(संपादन -दीनानाथ परब)