Badlapur Fire Accident : बदलापूर एमआयडीसी मध्ये डी.के. फार्मा या केमिकल कंपनीला आग!

आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश जीवितहानी नाही, मात्र दोन कर्मचारी किरकोळ जखमी
Badlapur Fire Accident
Badlapur Fire Accident Sakal

- मोहिनी जाधव

बदलापूर : बदलापूरच्या एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर १५ येथील डी.के फार्मा या केमिकल कंपनीला दुपारी १२ च्या सुमारास अचानक भीषण आग लागली, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

दुपारी अचानक एमआयडीसी परिसरातून धुराचे लोळ दिसू लागल्यावर सगळीकडे एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले कारण यापूर्वी जानेवारी महिन्यातच पहाटेच्या सुमारास विके केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाने लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा दोन महिन्याच्या फरकानेच येथील डी.के. फार्मा या कंपनीला देखील आज भीषण आग लागली.

डी.के.फार्मा या कंपनीत वैज्ञानिक प्रयोगशाळेत वापरण्यात येणारे व औषधांसाठी वापरात वापरात येणाऱ्या केमिकल चे रसायन प्रक्रिया होत असते. दुपारी अचानक कंपनीच्या ८/३२ या प्लॉटच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रिॲक्टर आणि प्रोसेसर या भागात ही आग लागली.

यावेळी आगीचे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम ने पाऊण तासात या आगीवर नियंत्रण मिळवले.

यापूर्वी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील आग प्रतिबंधक यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने आग जास्त प्रमाणात वाढली नाही अशी माहिती सोनोने यांनी दिली. या कंपनीत एकूण १५० कर्मचारी असून, शिफ्ट नुसार ड्युटी असल्याने, घटना घडली तेव्हा कंपनीत साधारण १०० माणसे असल्याचा अंदाज कंपनी व्यवस्थापक अजित बेहरे यांनी दिली.

या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, कंपनीत असलेल्या आग प्रतिबंधक यंत्रणेने आग विझवताना कंपनीतील एक कर्मचारी व नंतर अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून,

केमिकल आणि आगीचे डोळ्यांना रिअँक्शन झाल्याने त्यांच्यावर बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापकानी यांनी दिली. ही आग शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी, केमिकल ची गळती होऊन आग लागल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.

आगीचे कारण आम्ही नेमके आता सांगू शकत नाही. त्या कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. आमच्या कंपनीत एकूण १५० कर्मचारी कार्यरत आहेत मात्र, शिफ्ट ड्युटी असल्याने आगीची घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त नव्हती म्हणून आम्हाला लवकर सगळ्यांना सुखरूप बाहेर काढता आले. यात कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसून, लवकरच आगीचे कारण स्पष्ट होईल

- अजित बेहरे व्यवस्थापक डी.के. फार्मा कंपनी

आम्हाला या आगीची माहिती साधारण १२.०५ पर्यंत मिळाली. माहिती मिळताच आमची टीम याठिकाणी दाखल होऊन आम्ही या आगीवर पाऊण तासात नियंत्रण मिळवले. आम्ही येण्यापूर्वीच या ठिकाणी कंपनीतील आग प्रतिबंधक यंत्रणेच्या माध्यमातून आग विझवणे चालू असल्याने आम्हाला या आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले. यात आमच्या एका कर्मचाऱ्याला डोळ्यांना आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी आम्ही सरकारी इस्पितळात दाखल केले.

- भागवत सोनोने अधिकारी अग्निशमन दल बदलापूर

१८ जानेवारी २०२४ रोजी खरवई एमआयडीसी परिसरातील W-125A या विके केमिकल कंपनीत पहाटे ४.१५ वाजता रासायनिक प्रक्रिया होत असताना झालेल्या एकामागोमाग एक अश्या पाच स्फोटात कंपनी, एका कर्मचाऱ्याचा जळून तर चार कर्मचारी गंभीर रित्या जखमी झाले होते. या सगळ्या घटना पाहता बदलापूर एमआयडीसी भागात असलेल्या कंपनी मध्ये आग प्रतिबंधक योजना, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याच उपाय योजना नाहीत. त्यात या कंपनी आतील अडोश्याच्या भागात असल्याने आग लागल्यास आग विझवण्यासाठी येणारे अडथळे या सगळ्या बाबी अनेक प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com