बदलापूर : गेम ॲपच्या नादात चिमुरडा पोहोचला गोव्यात!

बदलापूर पोलिसांनी गोव्यातून आणले मुलाला शोधून
child attraction mobile game
child attraction mobile gamesakal media

बदलापूर : अल्पवयीन मुलांना (minor children) समाज माध्यमाचा (social media) अतिवापर हा घातक ठरू शकतो. त्यात पालकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (parents busy lifestyle) मुलांच्या मनावर परिणाम होतो. याचाच प्रत्यय बदलापुरात (badlapur) आला. पूर्वेकडे राहणारा एक १३ वर्षीय मुलगा एकलकोंडेपणा घालवण्यासाठी घेतलेल्या गेम ॲपमधून (game Application) मिळालेल्या टास्कच्या नादात घरात न सांगता परराज्यात निघून गेला. बदलापूर पूर्व पोलिसांना (badlapur police) हा मुलगा गोवा (goa) राज्यातील कलिंगुट येथे सापडला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन असून, त्याला सुखरूप घरी आणले आहे.

child attraction mobile game
मुंबई : राणीच्या बागेतून सात वर्षीय मुलगा बेपत्ता

बदलापुरातील या मुलाने डीस्कॉर्ड नावाचे गेम ॲप घेतले होते. यात अनेक मुलांचा एक गट होता. स्वतः ला सिद्ध करण्यासाठी म्हणून या मुलांनी एक टास्क स्वीकारला. यातील बदलापूर शहरातील या मुलाने टास्कच्या नादी लागून घरात न सांगता ३१ ऑक्टोबरला गोव्याला गेला. यावेळी पालकांकडून मुलगा हरवल्याची तक्रार आल्यानंतर, बदलापूर पोलिसांनी मुलाचा शोध त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून घेण्याचे ठरवले. त्यासाठी ठाणे सायबर पोलिसांची मदत घेत गोवा येथे कलिंगुट येथे मुलाचे लोकेशन आढळून आले. त्यानुसार बदलापूर पोलिसांनी गोवा पोलिसांच्या मदतीने बुधवारी (ता. ३) या मुलाला सुखरुप घरी आणले. या मुलाने यापुढे अशी चुक करणार नाही. पालकांना विश्वासात घेऊन सारे काही सांगत जाईन, अशी प्रांजळ कबुली दिली.

"पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलावे. मुलांनीही मोबाईलचा अनावश्यक वापर टाळणे आवश्‍यक आहे. मुले मोबाईलवर भारत सरकारने बंदी घातलेले कोणतेही ॲप वापरतात का, याचीही पालकांनी माहिती घ्यावी."
- श्रीकांत सोंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बदलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com