दिशा सालियान प्रकरणात नितेश राणेंना अटकपूर्व जामीन मंजूर

Nitesh-Rane
Nitesh-Ranesakal media
Updated on

दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली होती. दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता-पुत्रांनी केला होता.

त्यानंतर दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. दिशा सालीयान सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी तिने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. यानंतर कॉट्रोव्हर्सीला सुरुवात झाली. या प्रकरणात राणे पितापुत्रांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती.

नारायण राणेंनी अमित शाहांना फोन लावल्याचा दावा केला. या फोनमुळे त्यांनी पोलिसांनी सोडलं, असं राणे म्हणाले. त्यानंतर नितेश राणे यांनाही अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना कोर्टाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. काही अटी आणि शर्तींवर राणे पिता पुत्रांना हा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

दिंडोशी सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.यू. बघेले यांनी निर्णय दिला आहे. दिशा सालीयन संदर्भात आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी दोघांवर मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

NCP Leaders Upset Over Zeeshan Siddique Candidacy
pydhonie family death watermelon cause
new flyover in Thane traffic benefits
One Nation One E-challan
Marathi News Esakal
www.esakal.com