esakal | तब्बल ९ अटींवर रिया चक्रवर्तीला झाला जामीन मंजूर, अटींची पूर्तता न झाल्यास रद्द होऊ शकतो जामीन
sakal

बोलून बातमी शोधा

तब्बल ९ अटींवर रिया चक्रवर्तीला झाला जामीन मंजूर, अटींची पूर्तता न झाल्यास रद्द होऊ शकतो जामीन

मुंबई हायकोर्टाने रियाला खालील नऊ अटींवर जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.   

तब्बल ९ अटींवर रिया चक्रवर्तीला झाला जामीन मंजूर, अटींची पूर्तता न झाल्यास रद्द होऊ शकतो जामीन

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुरु झालेल्या तपासात ड्रग्स अँगलच्या अंतर्गत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केले होती. आधी NCB ची  चौकशी आणि नंतर तब्बल रियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.  आज तब्बल २८ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.मुंबई हायकोर्टाने रियाला जामीन मंजूर केलाय. मात्र, रियाची जरी जामिनावर सुटका झाली असली तरीही रियासोबत अटक करण्यात आलेल्या तिच्या भावाला, शोविक चक्रवर्तीला मात्र अद्याप जामीन  मंजूर झालेला नाही. 

अशात मुंबई हायकोर्टाने रियाला खालील नऊ अटींवर जामीन मंजूर केल्याची माहिती आहे.   

  • पासपोर्ट जप्त -

रियाचा पासपोर्ट जप्त करण्यात आलात. त्यामुळे रियाला देशाबाहेर जात येणार नाहीये. 

  • पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावणे -

रियाला जामीन जरी मंजूर झाला असला तरीही रियाला पुढील दहा दिवस पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावावी लागणार आहे.  

  • १ लाखांचे बेल बॉण्ड्स -

रियाला आज जो जामीन मंजूर करण्यात आलाय तो तब्बल  एक लाखांच्या जातमुचलक्यावर मंजूर करण्यात आलाय.

  • देश सोडून जात येणार नाही -

रियाचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केलाय. केस सुरु असेपर्यंत तरी रियाला देश सोडून परदेशी जाण्याची परवानगी नाहीये. 

  • साक्षीदाराला भेटता येणार नाही -

रियाला आज जामीन मंजूर झालाय, मात्र रिया चक्रवर्तीला कुणाही साक्षीदाराला भेटता येणार नाही .

  • मुंबई सोडण्याची परवानगी, पण...  -

रियाला मुंबई सोडून कुठेही बाहेरगावी (देशांतर्गत) जायचं झाल्यास तिला तपास अधिकाऱ्यांना रीतसर माहिती द्यावी लागेल. आपल्या प्रवासाचा कार्यक्रम देखील रियाला तपास अधिकाऱ्यांना द्यावा लागेल.  

  • तपास यंत्रणासमोर हजेरी -

रियाला पुढील सहा महिने महिन्याच्या पहिल्या समोवारी तपास यंत्रणांसमोर हजेरी द्यावी लागणार आहे.

  • कोर्टात हजेरी महत्त्वाची - 

कोर्टाकडून येणाऱ्या सर्व तारखांना रिया चक्रवर्तीची उपस्थिती अनिवार्य असेल.

  • तपास आणि पुराव्यांशी छेडछाड नको -

ड्रग्स अँगल प्रकारात आतापर्यंत जो तपास झाला आहे आणि जे पुरावे समोर आलेले आहेत त्याचे पुरावे तसंच तपासात हस्तक्षेप करता येणार नाही.

दरम्यान मुंबई हायकोर्टाने दिलेल्या अटींची पूर्तता न झाल्यास रियाचा जामीन रद्द होऊ शकतो. 

bail terms and conditions of rhea chakrabrty in SSR case by narcotic control bureau

loading image