
पाली : टिकाऊ, लागवडीचा अल्प खर्च, कमी मशागत, कमी वेळात अधिक उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या बांबूच्या लागवडीकडे अनेकजण वळत आहेत. बांधकाम व्यवसाय, मांडव उभारणी, विविध वस्तुनिर्मिती व शोभेसाठी आणि गुढीपाडव्यासाठी बांबूला मागणी वाढली आहे. याशिवाय पनवेल व मुंबई सारखी मोठी बाजारपेठ जवळ असल्याने ठिकठिकाणी शास्त्रशुद्धरित्या बांबू लागवड होत आहे. याबरोबरच प्रशसनाकडून देखील शेतकऱ्यांना बाबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात आहे.