डोंबिवली - रस्त्यावर साचलेल्या गटारीच्या घाण पाण्यात चक्क केळी धुतली जात असल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमेला उघडकीस आला आहे. याचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून हे विक्रेते नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.