
मुंबई | वांद्रेत दुमजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, १८ जखमी
मुंबईत मध्यरात्री वांद्रे भागात दुमजली इमारत कोसळली. शास्त्री नगर परिसरातील या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी आहेत. घटनेत गंभीर जखमी शाहनवाज (४०) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित १८ जखमींवर नजीकच्या भाभा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संबंधित दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्या. मुंबई पोलीस देखील तातडीने दाखल झाले. (Bandra Building Collapse)
या दुमजली बांधकामात बिहारहून आलेले मजूर वास्तव्याला होते. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली अनेकजण गाडले गेले. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अन्य काहीजण ढिगाऱ्याखाली दबल्याची भिती होती. त्यामुळे रात्रभर ढिगारा हलवण्याचं काम सुरू होतं. (Bandra Building Collapse Latest News)
दुमजली घर कोसळून मोठा आवाज झाला. या घराच्या डेब्रिजमध्ये १८ जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी युद्धपातळीवर झालेल्या बचावकार्यामुळे डेब्रिजच्या ढिगाऱ्यामधून १८ जणांना बाहेर काढण्यात यश आले. सर्व जखमींना लागलीच रुग्णवाहिका, मिळेल त्या वाहनाने नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या १८ जखमींपैकी अनेकांना डोक्याला, हाताला, पायाला, तोंडाला, कमरेत मार लागला व जखमा झाल्या. या जखमींपैकी एक शाहनवाज (४०) या व्यक्तीचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तर उर्वरित १८ जखमींवर भाभा व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या १८ जखमींमध्ये २ अल्पवयीन मुले, ६० वर्षांवरील ३ व्यक्ती व तरुण मुले यांचा समावेश आहे. मात्र या १८ जखमींपैकी एकजण रुग्णालयात उपचार घेत असून उर्वरित १७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला आहे.
घटनास्थळी मध्यरात्री उशिरापर्यंत डेब्रिज उचलण्याचे व त्याखाली आणखीन कोणी अडकले आहे का , हे शोधण्याचे काम सुरू होते.दरम्यान, ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा: मुंबई : कांदिवलीत इमारत कोसळून चार वर्षीय मुलाचा मृत्यू; दोघे जखमी
गुरुवारी म्हणजेच आज मध्यरात्री 12.15 च्या सुमारास ही इमारत कोसळली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी दिली. अन्य १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते आता सुरक्षित आहेत, असं ते म्हणाले. हे सर्व बिहारमधील मजूर आहेत. अग्निशमन दल आणि अधिकारी घटनास्थळी हजर असल्याचं सिंगे यांनी सांगितलं.
या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट केलंय.
नुकतंच वांद्रे पश्चिम भागात इमारत कोसळल्याचं ऐकलं.महापालिकेचं अग्निशमन दल घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे. जखमींचा नेमका आकडा हॉस्पिटलकडून मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्या सर्वांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा. अपडेट्ससाठी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील, असं ठाकरे यांनी ट्विटवरून सांगितलं.
Web Title: Bandra Building Collapse One Died In Building Collapse In Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..