न्हावाशेवा बंदरातून पकडले तब्बल एक हजार कोटींचे हेरॉईन; वाचा कोठून आले एवढ्या मोठ्या प्रमाणात हेरॉईन

अनिश पाटील
Monday, 10 August 2020

सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने(डीआरआय) यांनी संयुक्तरित्या न्हावा शेवा बंदरात केलेल्या कारवाईत 191 किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत एक हजार कोटी रुपये असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. अफगाणिस्तानावरून हे ड्रग्स आले होते.

मुंबई : सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने(डीआरआय) यांनी संयुक्तरित्या न्हावा शेवा बंदरात केलेल्या कारवाईत 191 किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत एक हजार कोटी रुपये असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. अफगाणिस्तानावरून हे ड्रग्स आले होते.

दिलासादायक! इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी;  दोन महिन्यांत प्रमाण इतके घसरले

न्हावा शेवा बंदरात परदेशातून ड्रग्सचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय व सीमा शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने बंदरात शोध मोहिम राबवून रविवारी संशयीत कंटेनर शोधून काढला. आयुर्वेदीक मुलेठीच्या नावाखाली त्यातन हेरॉईन लपवून आणण्यात आले होते. त्याशिवाय काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लवपण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

एसटीतील चालक महिलांच्या प्रशिक्षणाला ब्रेक; 236 महिला कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधारात

मुलेठीला भारतात मोठी मागणी आहे. त्यामुळे आयुर्वेदीक औषधाच्या नावाने हा ड्रग्सचा साठा भारतात पाठवण्यात आला होता. त्यानुसार शोध मोहिम राबवून हा साठा जप्त करण्यता आला आहे. याप्रकरणी कंटेनरशी संबंधीत दोन व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. या मागे मोठे रॅकेट असून हा सर्व साठा मुंबई व गोव्यामध्ये जाणार असल्याचा संशय आहे.आंतराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत पाच कोटी रुपये किलो आहे. लॉकडाऊनच्या काळात देशात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या हा सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा आहे. याप्रकरणाचे तार परदेशापर्यंत जात आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banned powder worth 1000 crore seized from navhashiva port