शिवसेनेच्या बॅनरबाजीने भाजपचा संताप? बॅनर उतरविण्यासाठी थेट पोलिसांत धाव

शर्मिला वाळुंज
Wednesday, 30 December 2020

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावल्यामुळे संजय राऊत यांनी भाजपावर निशाना साधला. त्यांच्या समर्थनार्थ मुंबई, डोंबिवली शहरातही शिवसेनेने भाजपा विरोधात बॅनरबाजी करीत राऊत यांना पाठींबा दर्शविला.

डोंबिवली - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावल्यामुळे संजय राऊत यांनी भाजपावर निशाना साधला. त्यांच्या समर्थनार्थ मुंबई, डोंबिवली शहरातही शिवसेनेने भाजपा विरोधात बॅनरबाजी करीत राऊत यांना पाठींबा दर्शविला. ही गोष्ट भाजपाच्या चांगलीच वर्मी लागल्याची चर्चा शहरात सुरु होती. कल्याण डोंबिवली भाजपा शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांसह काही भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी थेट रामनगर पोलिस ठाणे गाठीत पोलिसांना हे बॅनर तातडीने उतरविण्याची मागणी केली. पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांची भेट घेतल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर व्हायरल केली आहे. 

ठाणे, मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कल्याण डोंबिवली शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना व भाजपामधील राजकारण तापू लागले आहे. ईडी चौकशी प्रकरणावरुन शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपावर निशाना साधला होता. राऊत यांना पाठींबा दर्शवित डोंबिवलीतील शिवसैनिकांनीही स्टेशन परिसरात मोठे बॅनर लावून भाजपाचा समाचार घेतला. या बॅनरची चर्चा दिवसभर शहरात सुरु होती. बुधवारी भाजपाचे शशिकांत कांबळे यांनी सकाळीच रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांची भेट घेत हे बॅनर काढण्याची मागणी केली. त्यानंतर शहरातील बॅनर उतरले. यामुळे ही गोष्ट भाजपाच्या चांगलीच वर्मी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.

banners in dombivali against bjp by shivsena supporters

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banners in dombivali against bjp by shivsena supporters