BARC Scientist Died: BARC च्या शास्त्रज्ञाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Women sucide
Women sucideSakal
Updated on

BARC Scientist Died in trombay today

मुंबई- ठाण्याच्या हद्दीतील बीएआरसीच्या Bhabha Atomic Research Centre (BARC) शास्त्रज्ञांने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मनिष सोमनाथ शर्मा (वय ५०) असं आत्महत्या केलेल्या शास्त्रज्ञांचे नाव आहे. सोमवारी ट्रॉम्बेतील राहत्या घरी त्यांनी गळफास घेतला. त्यांना बीएआरसीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने मनिष शर्मा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण, शर्मा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यांच्या खोलीमध्ये पोलिसांना सुसाईड नोट आढळलेली नाही. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत कळू शकलेलं नाही. पोलिसांनी पत्नीचा जवाब दाखल करुन घेतला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Women sucide
Delhi Crime: शालेय विद्यार्थ्यांवर वर्गातील मुलांकडूनच सामुहिक अत्याचार; शिक्षकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांत शास्त्रज्ञांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मनिष शर्मा बीएआरसीमधील शास्त्रज्ञ होते. शर्मा यांनी नायलॉनच्या दोरीने पंख्याला लटकून गळफास घेतला. त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ निर्माण झालीये. ट्रॉम्बे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com