दहावी-बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून विद्यार्थ्यांना रोखले; कोरोनाकाळातील शुल्क न भरल्याने अडवणूक 

तेजस वाघमारे
Sunday, 10 January 2021

कोरोनामुळे अनेक पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरता आले नाही. शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावी-बारावीचे अर्ज भरण्यापासून अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. 

मुंबई  : कोरोनामुळे अनेक पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरता आले नाही. शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळांमधून दहावी-बारावीचे अर्ज भरण्यापासून अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. 

 

लॉकडाऊनमध्ये अनेकांचा रोजगार गेला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन शिक्षण सुरू करताच शाळांनी पालकांकडे शुल्क भरण्यास तगादा लावला. शाळा बंद असल्यामुळे 50 टक्के शुल्क घ्यावे, अशी मागणी केली. या मागणीवरून शाळा आणि पालक यांच्यात अनेक वाद झाले. हा वाद न्यायालयातही पोहचला. यानंतर काही शाळांनी शुल्क कपात केली तर वेतन कमी झालेल्या पालकांना दिलासा दिला आहे; मात्र काही शाळांनी शुल्क न भरलेल्या पाल्यांची अडवणूक करण्यास सुरुवात केली आहे. असाच प्रकार पवई येथील एस. एम. शेट्टी हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेजमधील शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास दिले नव्हते. पहिले शुल्क भरा. नंतर परीक्षा अर्ज भरा, असे सांगण्यात आल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच अशाप्रकारे भूमिका घेणाऱ्या शाळांवर कारवाईची विनंती मनविसेने केली आहे. यासंदर्भात शाळेशी संपर्क साधला असता शाळेने ज्या पालकांना शुल्क भरणे शक्‍य नाही अशा पालकांनी त्याचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे. त्यानुसार त्यांना शुल्कमाफी देण्यात येणार असल्याचे सांगितले. 

Barred students from filling up 10th 12th exam forms Obstacles to non-payment of coronal fees

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Barred students from filling up 10th 12th exam forms Obstacles to non-payment of coronal fees