एनआरसी विरोधातील लढाई एका दिवसात संपणार नाही; संविधान वाचविण्याचे कन्हैय्या कुमारचे आवाहन

एनआरसी विरोधातील लढाई एका दिवसात संपणार नाही; संविधान वाचविण्याचे कन्हैय्या कुमारचे आवाहन


कळवा : नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधातील (एनआरसी) लढाई एका दिवसात संपणारी नाही. मोठ्या काळापर्यंत ही लढाई सुरू ठेवावी लागणार आहे. हे दोन कायदे संविधानाच्या मूळावर घाला घालणाऱ्या आहेत.  त्यामुळे सर्वांनी संविधानाला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे असे आवाहन युवा नेता कन्हैय्या कुमार यांनी नागरिकांनी केले. 


मित्तल ग्राउंड येथे कूल हिंद मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मुशायऱ्याला कळवा, मुंब्रा-कौसासह राज्यभरातील सुमारे एक लाख लोक उपस्थित होते. या मुशायऱ्याला भेट देण्यासाठी कन्हैय्या कुमार हे आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सदर प्रतिपादन केले. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ऋता आव्हाड, किमान वेतन आयोगाचे माजी अध्यक्ष सय्यद अली अश्रफ, आयोजक शमीम खान, नगरसेवक शानू पठाणे मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा आशरीन राऊत, नगरसेवक सिराज डोंगरे, मोरेश्वर किणी, नगरसेविका हाफिजा नाईक, वृक्ष प्राधिकरण सदस्या संगिता पालेकर, ब्लॉक अध्यक्ष बबलू शेमणा आदी उपस्थित होते. 

ही बातमी वाचा ः देवेंद्र फडणविस दुर्देवी गृहमंत्री, वाचा कोणी म्हणालं
कन्हैय्या कुमार म्हणाले, कोणत्याही नागरिकाचा जातीचा, धर्माच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये, असे संविधानात म्हटले आहे. मात्र, देशातील परिस्थिती याउलट आहे. आपल्या संविधानांबद्दल प्रेम नाही नसलेले लोकं दोन्ही योजनांचे समर्थन करत आहेत कोणतेही आंदोलन यशस्वी करायचे असेल, तर संयम आणि शिस्त आवश्‍यक आहे. या दोन्ही गोष्टी योग्य पद्धतीने आचरणात आणायला हव्यात, अशी सूचना कन्हैय्या यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केली. तसेच मुशायऱ्याच्या माध्यमातून एनसीआर आणि सुधारीत नागरिकत्व कायदा यांच्याविरोधात लढा उभारण्यात आला आहे. हा लढा म्हणजे लोकशाही वाचविण्यासाठीचा संघर्ष आहे. त्यामुळे हा मुशायरा म्हणजे एक जनआंदोलनच आहे असे कन्हैय्या कुमार यावेळी म्हणाले. 
 
संविधानामुळे देश एकसंध 
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, हा देश बाबासाहेब आंबेकडर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच एकसंघ आहे. आज या देशातील दलित, शोषीत, पिडीत वर्ग शिक्षण घेऊ शकला, रोजगार मिळवू शकला. यामागे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच महत्वाचे आहे. मात्र, या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो आम्ही हाणून पाडू, असा इशारा दिला. 

कागज नही दिखायेंगे... 
या मुशायरामध्ये जौहर कानपुरी, इम्रान प्रतापगढी, सुनील जोगी, हाशीम फिरोजाबादी, नदीम शाद, अखिलेश द्वीवेदी, असद मेहताब, इरफान जाफरी, असद आजमी, हंगामा आझमी, अतहर सागर, अंजूम रेहबर, शबीना अदीब, सुमन दुबे, बलराम पुरी, नुजहत अंजुम, उरुसा आरषी, महेक कैरावी आदी शायर-कवी यांनी देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या रचना सादर केल्या. इम्रान प्रतापगढी यांनी तरुणांना आवाहन करताना कागज नही दिखायेंगे... ही कविता सादर करताच रसिकांनी जोरदार जल्लोष केला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com