'BCCI'चे अध्यक्ष सौरभ गांगुली कडून डी वाय पाटील स्टेडियमची पाहणी

नवी मुंबईतील क्रिकेटप्रेमींनालागले आयपीएलचे वेध
Sourav ganguly
Sourav gangulysakal media

खारघर : काही दिवसांवर आलेल्या आयपीएलचे (IPL Matches) २० सामने होणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) डी. वाय. पाटील स्टेडियमच्या (DY Patil Stadium) तयारीची पाहणी बीसीसीआयचे (bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav ganguli) यांनी केली. सुरुवातीच्या सामन्यांसाठी २५ टक्के प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे, परंतु सध्या कोरोना (corona) नियंत्रणात आल्यामुळे पूर्ण क्षमतेसाठी प्रेक्षकांना परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Sourav ganguly
विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी का भडकावले? हायकोर्टाने हिंदुस्थानी भाऊला फटकारले

आयपीएलचा डी. वाय. पाटील स्टेडियममधील पहिला सामना २७ मार्च रोजी विराट कोहलीच्या बेंगळूरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. सौरभ गांगुली यांनी मंगळवारी स्टेडियमची पाहणी करून नवी मुंबई पोलिसांसमवेत सुरक्षाविषयी माहिती घेतली. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील; तर पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आयपीएलचे सामने होणार आहेत. कोरोना नियंत्रणात आलेला असला तरी राज्य सरकारने सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी चारही ठिकाणी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली आहे.

नवी मुंबई आणि पनवेल महापालिका परिसरात कोरोना रुग्णांची क्षमता शून्यावर आलेली आहे. तसेच शासनाने बहुतांश ठिकाणी सर्व निर्बंध हटवले आहेत. तसेच बसेस आणि लोकल रेल्वेत प्रवासी दाटीवाटीने प्रवास करीत आहेत, त्यामुळे शासनाने डी. वाय. पाटील स्टेडियम पूर्ण क्षमतेने खुले करावे.

- लीना गरड, क्रिकेटप्रेमी व नगरसेविका.

डी. वाय. पाटील स्टेडियम सुरुवातीला २५ टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे. उर्वरित सामन्यांनंतर पूर्ण क्षमता वाढवण्यासाठी निर्णय झाल्यास खुले केले जाईल.
- सुरेश मेंगडे, पोलिस उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com