esakal | सावधान! 'Zoom App' वापरताय? मग सावध राहा; महाराष्ट्र सायबर विभागाचं नागरिकांना आवाहन.. 
sakal

बोलून बातमी शोधा

zoom app

सध्या काळात बरेच नागरिक वर्क फ्रॉम होम करत आहेत. ऑनलाईन मिटींग्ज करिता वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक  बनवली आहेत.

सावधान! 'Zoom App' वापरताय? मग सावध राहा; महाराष्ट्र सायबर विभागाचं नागरिकांना आवाहन.. 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सध्या काळात बरेच नागरिक वर्क फ्रॉम होम करत आहेत. ऑनलाईन मिटींग्ज करिता वापरायला सोपे असल्याने zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक  बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

आपल्या सहकाऱ्यांबरोबरच्या ऑनलाईन मिटींग्ज करिता Zoom , Microsoft meetings , Skype , Cisco Webex इत्यादी अप्लिकेशन्स वापरली जात आहेत.  Zoom त्यामध्ये वापरायला सोपे असल्याने या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे.

हेही वाचा: सर्वात मोठी बातमी : कोरोनावर आली गोळी, किंमत १०३ रुपये; मुंबईत होणार उत्पादन...

महाराष्ट्र सायबर सेल ने सर्व नागरिकांना विशेष करून Zoom App  वापरणाऱ्यांना हे अँप वापरताना सावध राहण्याअव्हे आवाहन केल आहे . सायबर भामट्यांनी Zoom App सदृश्य काही Malware व फेक अँप्स बनवली आहेत . तुम्ही जर ती डाउनलोड केलीत तर तुमच्या सर्व मिटींग्ज रेकॉर्ड होतील व तुमची सर्व माहिती त्यांना मिळू शकते व तुमच्या मोबाईल किंवा संगणकाचा ताबा देखील हे सायबर भामटे घेऊ शकतात.  

सर्व नागरिकांनी झूम अँप हे अधिकृत वेबसाईट किंवा प्लेस्टोअरवरूनच डाउनलोड करावे . शक्यतो कुठलीही कॉन्फिडेन्शिअल माहिती अशा मिटींग्समध्ये बोलणे टाळावे किंवा संबंधित लोकांशी थेट बोलूनच त्यांना हि माहिती द्यावी.

मिटिंग ऍडमिनने मिटिंगचे Id व पासवर्ड हे शक्यतो संबंधित व्यक्तींनाच थेट कळवावेत ,तसेच सदर पासवर्ड हा थोडा क्लिष्ट ठेवावा जेणेकरून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीस तो समजण्यास कठीण जाईल. तसेच संबंधित मिटिंग ऍडमिन /होस्टने फक्त मिटिंगच्या विषयाच्या संबंधित व्यक्तींची login request accept करावी.

हेही वाचा: मुंबईकरांनो आनंदाची बातमी!  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावात अधिक पाणीसाठा..

तसेच तुम्ही जर मीटिंग होस्ट असाल तर पुढील बाबी पण लक्षात ठेवा: 

1) तुम्हाला जो random मिटींग id व पासवर्ड मिळेल त्याचाच  शक्यतो वापर करा, तुमचा कुठलाही id किंवा पासवर्ड वापरू नका. 

2) तुम्ही मिटींग setting अशा प्रकारे बदल करा कि तुमच्या शिवाय मिटींग मधील अन्य कोणीही व्यक्ती ती रेकॉर्ड करू शकणार नाही . 

3) मिटींग मध्ये सर्व अपेक्षित व्यक्तींनी login केल्यावर सदर मिटींग लॉक करा जेणेकरून अन्य कोणी व्यक्ती त्यात login करू शकणार नाही . 

4) मिटिंग setting अशी करा कि तुमच्या आधी व तुमच्या परवानगीशिवाय कोणी त्यात login करू शकणार नाही.

5)तुम्ही ,जर काही कारणाने मिटींग सोडून जात असाल किंवा  मिटिंग संपली असेल तर leave मिटींग चा option न वापरता end मिटींगचा option वापर करा . 

6) मिटिंगची लिंक id व पासवर्ड ओपन फोरम वर शेअर करू नका .

be aware while using zoom app said cyber department 

loading image
go to top