दिवेआगरचा किनारा
दिवेआगरचा किनारा sakal

Raigad : दिवेआगरचा किनारा दुर्लक्षित ; श्रीवर्धनच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याची मागणी

तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आहे. मात्र, येथील किनारा अद्याप परिपूर्ण विकसित करण्यात आलेला नाही. किनाऱ्यावर पर्यटनदृष्ट्या आधुनिक सुविधांबरोबरच सुशोभीकरण करण्याची मागणी पर्यटक व स्थानिकांतर्फे होत आहे.

श्रीवर्धन : तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य पर्यटकांवर नेहमीच भुरळ घालत आहे. मात्र, येथील किनारा अद्याप परिपूर्ण विकसित करण्यात आलेला नाही. किनाऱ्यावर पर्यटनदृष्ट्या आधुनिक सुविधांबरोबरच सुशोभीकरण करण्याची मागणी पर्यटक व स्थानिकांतर्फे होत आहे.

दिवेआगरला निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेले आहे. या सुवर्णभूमीला पर्यटनाबरोबर येथील सुवर्ण गणपतीमुळे धार्मिक स्थळाचे वैभव प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील स्वच्छ व सुरक्षित समुद्रकिनारी नेहमीच मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे.

दिवेआगरचा किनारा
Raigad News : इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात; वृध्द इसम निम्स बादल यांची हत्या करून त्याची गाडी व दागिने घेवुन फरार

मात्र, येथील किनाऱ्यावर पर्यटनदृष्ट्या कोणत्‍याही सोयीसुविधा करण्यात आलेल्‍या नाहीत. येथे बसण्यासाठी साधी आसनांचीदेखील सोय करण्यात आलेली नाही; तर दिवाबत्ती नसल्‍याने संध्याकाळी किनाऱ्यावर अंधाराचे साम्राज्‍य निर्माण होते. त्‍यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. येथील सुंदर समुद्रकिनारा न्याहाळण्यासाठी बैठकासोबतच पथदिव्यांची सुविधा करावी, अशी मागणी येथील ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे.

शिवाय श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगरचा विकास होणे अपेक्षित आहे. नुकतेच दिवेआगर समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. दिवेआगरची चौपाटी चार किलोमीटर अशी विस्तीर्ण आहे. त्‍यामुळे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण केल्‍यास पर्यटन वाढीस चालना मिळू शकते, असे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.

दिवेआगर किनारी धूप रोखण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे. पुढे सुशोभीकरणासाठी बांधकाम होऊन पर्यटकांसाठी सुविधा मिळाव्यात, अशी मागणी मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याशिवाय नवीन ग्रामपंचायत इमारतीचीदेखील मागणी केली जात आहे.

- सिद्धेश कोसबे, सरपंच, दिवेआगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com