esakal | कोरोना, लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे ५०० कोटीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai local

कोरोना, लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे ५०० कोटीचे नुकसान

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 23 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प पडल्यामुळे 2020 मध्ये 36 हजार 993 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर, मुंबई उपनगरीय लोकलसाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

आधीच तोट्यात असलेली भारतीय रेल्वेला कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामुळे आर्थिक गर्तेत अडकलेली आहे. अनेक विशेष गाड्या रद्द करण्यात येत असल्याने यातून मिळणारे उत्पन्न देखील बुडत आहे. उत्पन्न कसे वाढवावे, तोटा भरून कसा काढायचा असा प्रश्न भारतीय रेल्वेला पडलेला आहे.

डिसेंबर 2020 पर्यंत 36 हजार 993.82 कोटी रुपयांचे नुकसान भारतीय रेल्वेचे झाले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नुकताच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार रेल्वे महसुलात 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2020 अखेरपर्यंत 17 हजार 574.60 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. या काळात मालवाहतूक महसुलात 6 हजार 785 कोटी रुपयाचा तोटा सहन करावा लागला आहे. हा आकडा डिसेंबर 2020 रोजीपर्यंत 37 हजार कोटींपर्यंत गेला आहे.

loading image