बेलापूरात आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू... रुग्णांना मिळणार दिलासा

सुजित गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

  • अत्याधुनिक रुग्णवाहीका आजपासून सेवेत रुजू
  • मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून मिळाल्या रुग्णवाहीका

नवी मुंबई: बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून अखेर महापालिकेला अत्याधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 3 रुग्णवाहीका सेवेत रुजू झाल्या. तब्बल 50 लाख रूपये खर्च करून या रुग्णवाहीका ताफ्यात आल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

नाशिकमध्ये घर घेण्याच विचार करताय? म्हाडाने तुमच्यासाठी आणलीये 'ही' खास योजना

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णवाहिका तसेच व्हेंटीलेटरची शहरात अतिशय कमतरता होती. तसेच खाजगी रुग्णवाहिकांचे चालक अवाढव्य रक्कम सांगून लुटालुटीचे प्रकार सुरु आहेत. खाजगी रुग्णवाहिकांच्या मालकांची मुजोरी पाहता तसेच रुग्णवाहिकांची वाढती मागणी लक्षात घेता आमदार निधीतून सर्व सुविधांयुक्त अशा 3 रुग्णवाहिका वैद्यकीय सेवेकरिता उपलब्ध करून देण्याचा मनोदय मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला होता. नवी मुंबई शहरात कोरोना विषाणूंच्या आजाराने थैमान घातल्याने रुग्णांच्या वाढत्या संख्येपूढे उपलब्ध असणाऱ्या रुग्णवाहीका कमी पडत होत्या. याकरिता म्हात्रे यांनी सतत पाठपुरावा करून 3 सुसज्ज रुग्णवाहिका आज नवी मुंबई महापालिके उपलब्ध करून दिल्या.

मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव झळकणार स्पॅनिश चित्रपटात...

त्यानुसार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांंमार्फत निधी उपलब्ध होऊन सदरच्या तीन कार्डियाक रुग्णवाहिका तयार केल्या आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सुविधा, बेसिक इंजेक्शन, स्ट्रेचर, प्राथमिक उपचार, फायर सिस्टम, इमर्जन्सी रिस्पॉन्स फ्लॅशिंग लाईट अशा आपत्कालीन वैद्यकीय सुविधांनी सज्ज केली आहे. यापूर्वीही माझ्या आमदार निधीतून 3 रुग्णवाहिका महापालिका हॉस्पिटलसाठी देण्यात आल्या आहेत.  माझ्या मतदारसंघातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी हे माझे प्रथम कर्तव्य असून 50 लाख रुपये रुग्णवाहिकांसाठी तसेच 50 लाख रुपये व्हेंटीलेटरकरिता आमदार निधीतून देण्यात आले आहेत. लवकरच वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हेंटीलेटरही उपलब्ध होणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंदा म्हात्रे, माजी सभापती संपत शेवाळे, महामंत्री विजय घाटे, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील, दीपक पवार, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार संबंधित अधिकारी उपस्थित होते.

--------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Belapur, ambulances equipped with modern technology are in the service of the citizens ... Patients will get relief