बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Marathi Sahitya Sammelan 2022

बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरात

मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत तीसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची सुरूवात होणार आहे. संमेलनाच्या तयारीची अंतिम आढावा बैठक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी घेतला. यावेळी साहित्य परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगावच्या मराठा मंदिर इथे समेलनाची सुरुवात सकाळी 9 वाजता ग्रंथपूजनाने होणार आहे त्या नंतर ग्रंथ दालनाचे उदघाटन होणार आहे. सकाळी 10 वाजता साहित्य संमेलनाचा मुख्य उदघाटन सोहळा संपन्न होणार आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर विशेष अतिथी कॉग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे आहेत. साहित्य परिषदॆचे राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार,ज्ञानेश्वर पतंगे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध उद्योगपती अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील हे स्वागताध्यक्ष पद भूषिवत आहेत.

संमेलनाचे नियोजन साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड सुधीर चव्हाण व त्यांचे सहकारी करीत आहेत, उदघाटन सोहळया नंतर दुपारी 1 वाजता सुप्रसिद्ध कवी शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न होणार आहे त्यामध्ये अनेक नांमवंत कवी सहभागी होणार आहेत,त्यानंतर साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.

Web Title: Belgaum Marathi Sahitya Sammelan 2022 President Of Akhil Bharatiya Marathi Sahitya Parishad Sharad Gore Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top