बेस्ट बसही अधिक क्षमतेने सुरू होणार; मुंबईकरांना दिलासा मिळणार

बेस्ट बसही अधिक क्षमतेने सुरू होणार; मुंबईकरांना दिलासा मिळणार

मुंबई - कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचारी बस ने प्रवास करीत आहेत. बसच्या वाहतूक सेवेवर त्याचा मोठा ताण पडत आहे. त्यामुळे मुंबईतील बेस्ट प्रशासन प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बेस्ट बसेस मध्ये सध्या एकाच आसनावर बसण्याची परवानगी आहे. आता दोन्ही आसनांवर प्रवाशांना बसण्याची परवानगी बेस्ट प्रशासन राज्य सरकारकडून घेणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःच्छ हरी ओम म्हणत राज्यातील व्यवहार पुन्हा पुर्वरत सुरू करण्यास सुरूवात केली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसे पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. आता बेस्ट उपक्रमदेखील पुर्ण क्षमतेने सुरू करण्याची विनंती राज्य सरकारकडे करणार आहे. त्यामुळे बेस्ट बसेससुद्धा लवकरच अधिक क्षमतेने सुरू होऊ शकण्याची चिन्हे आहेत.

एसटी बसेस पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या तरी, त्यांचे निर्जंतुकीकरण वेळोवेऴी करण्यात येणार आहे. तशा सुचना महामंडळाने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेस्ट बसेसमध्य़ेही नियोजन करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियमपाळत ८ जूनपासून बेस्टमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाला मुभा दिली होती. लोकल बंद असल्याने खासगी क्षेत्रातील प्रवाशांचा ताण बसेसवर पडत आहे. त्यामुळे बेस्टच्या आसनक्षमता वाढवण्याचा विचार प्रशासन करीत आहे. बेस्टमध्ये दोन आसनावर एक व्यक्ती आणि उभ्याने 5 व्यक्ती ्सध्या नियम आहे. परंतु यामुळे बेस्टच्या तोट्यात वाढ होत आहे. प्रवासी संख्या वाढवल्यास बेस्टचा तोटाही कमी होण्यास मदत होणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com