Bhandara fire in hospital | रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका; चौकशी समितीचा धक्कादायक निष्कर्ष 

Bhandara fire in hospital | रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका; चौकशी समितीचा धक्कादायक निष्कर्ष 

मुंबई  -  भंडारा रुग्णालय आग प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाकडे सोपवण्यात आला आहे. 50 पानाच्या या अहवालात शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आग लागली तेव्हा नवजात शिशूंच्या केअर वार्डात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता असा ठपका या अहवालात ठेवला गेला आहे. चौकशी समितीने कुणावरही कारवाई करण्याची  शिफारस केली नाही, हे विषेश. मात्र या अहवालाचा अभ्यास करुन दुर्लक्ष दाखवणाऱ्यावर कारवाई केली जाईल अस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 
 
भंडारा जिल्हा रुग्णालय़ात नवजात शिशू केअर वार्डात लागलेल्या आगीनंतर तब्बल 11 दिवसनांतर चौकशी समितीचा अहवाल आला आहे. या आगीत तब्बल 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. आगीच्या घटनेच्या वेळी केअर वार्डात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.  वैद्यकीय नियमानूसार या यूनीटमध्ये  चोवीस तास  कर्मचाऱ्यांनी उपस्थिती राहणे आवश्यक असते. मात्र ड्यूटीवर असलेल्या  असलेल्या कर्मचाऱ्यांनी ते इतर वार्डातील रुग्णांचा अहवाल घेत असल्याचे चौकशी समितीपुढे सांगीतले. या यूनीटला आग लागल्यानंतर काही वेळानंतर परिचारीकांनी वार्डाकडे धाव घेतली. मात्र सर्वत्र धूर पसरल्यामुळे 15 ते 20 मिनीटे कुणालाच यूनीटमध्ये  प्रवेश करता आला नाही.असही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे आग विझवण्यासाठीचा महत्वाचा वेळ वाया गेला.

चौकशी समितीने या यूनीटमधील मशीनरी ( यंत्रसामुग्रीत) काही तांत्रिक बिघाड होते का याची तपासणी केली. मात्र त्यामध्ये मशीनरी नियमीत दुरुस्त करुन घेण्यात येत होत्याचे समजले. मात्र यूनीटमधील मशीनरीचे (यंत्रसामुग्रीची) नियमित तपासणी (मेंटेनंन्स) होत होते का याचे ठोस पुरावे अजूनही चौकशी समितीच्या हाती आलेले नाही. वर्षभरापुर्वी एका खाजगी सल्लागार कंपनीकडून फायर ऑडीट करुन घेण्यात आले होते. अस सांगण्यात आले. मात्र त्याचेही ठोस पुरावे देण्यात आलेले नाही. 

भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. हा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गरज पडल्यास मंत्रीमंडळाच्या निदर्शनास आणून देवू . या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्यावर दोषीवर कारवाई होईल
राजेश टोपे,
आरोग्य मंत्री 


.... 
तर मुलांचा जीव वाचू शकला असता... 
बेबी केअर यूनीटमध्ये जर एखादा कर्मचारी उपस्थित राहीला असता तर  शॉट सर्कीटमुळे लागलेली आग तातडीने  नियंत्रणात येऊ शकली असती. पहिल्या माळ्यावर हे यूनीट आहे. त्यामुळे आग लागल्य़ावर प्रत्यक्षात धुराचे लोळ बाहेर आल्यानंतरच कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे कळले.  या सर्व प्रकारामुळे आग विझवण्यासाठी सुरुवातीचा महत्वाचा वेळ (गोल्डन  हॉअर) वाया गेला. आग भडकल्यानंतर सर्वत्र धूर पसरला होता, त्यामुळे या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या यूनीटच्या आतमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यानंतर स्थानिक अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत नवजात शिशूंना आपला प्राण गमावावा लागला. भंडारा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडे आग विझवतांना कृत्रीम श्वासोच्छवासाची उपकरणेही नव्हती असही चौकशी समितीच्या निदर्शनास आले. यूनीटमध्ये उपस्थीत न राहणाऱ्या  वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वर्तन वैद्यकीय नितीमत्तेला ( इथिक्सला)  धरुन नव्हते असा ठपका डॉक्टरांच्या  इथिकल समितीने ठेवला आहे. 
...
अहवालाचे पुढे काय
चौकशी समितीने अहवाल आज आरोग्य विभागाकडे सादर केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत चौकशी समितीच्या सदस्यांची बैठकही झाली. या अहवालाचा आरोग्य विभाग अभ्यास करणार आहे. आवश्यकता पडल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे या अहवालासंदर्भात चर्चा होईल. गरज पडल्यास आगामी मंत्रीमंडळ बैठकीत हा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता दोषींवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

Bhandara fire in hospital The shocking conclusion of the inquiry committee blamed the negligence on the hospital staff

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com